Cyclone Fengal Viral Video : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सध्याया ठिकाणी ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. फेंगल चक्रीवादळ रविवारी पहाटे उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर पोहोचले. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या दोन्ही ठिकाणी गुरुवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे चेन्नई विमानतळ रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत बंद करण्यात आले. यावेळी चेन्नईमधले अनेक व्हिडिओ समोर आले, अशातच चक्रीवादळाच्या वेळी लँडिंगसाठी धडपडत असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस A320 निओ विमानाचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या चक्रीवादळाची ताकद नेमकी किती होती हे या व्हिडीओतून पाहाया मिळतंय. धावपट्टीवर एक विमान चक्क हवेच्या दाबामुळं कलंडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा