उत्सवाच्या या दिवसांमध्ये विविध प्रकारचे ब्रँड त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यात गुंतलेले असतात. ज्यासाठी विविध विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने अनेक विषयांवर जाहिराती केल्या जातात. पण अनेक वेळा या जाहिरातींमुळे ब्रँड्स ट्रोल होतात आणि लोक त्यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याची मागणी करू लागतात. अलीकडेच डाबरला त्याच्या नवीनतम करवा चोथच्या जाहिरातीसाठी ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या जाहिरातीनंतर डाबरनेही माफी मागितली होती पण लोकांनी त्याची माफीही स्वीकारली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका संक्षिप्त निवेदनात डाबर म्हणाले: “महिलांची करवा चौथ मोहीम सोशल मीडिया हँडलवरून मागे घेण्यात आली आहे आणि अनवधानाने लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आम्ही बिनशर्त माफी मागतो.”

तसेच या आठवड्यात डाबरच्या जाहिरातीवरील वादाला मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांच्या धक्कादायक विधानाने चिन्हांकित केले होते, ज्यांनी कंपनीला धमकी दिली होती की ”आयुर्वेद आणि हर्बल उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर असलेला आणखी एक ‘मेड इन इंडिया’ ब्रँड आहे. मात्र त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या या जाहिरातीवर कायदेशीर कारवाई करा.” असे गृहमंत्र्यांन करून सांगण्यात आले.

तसेच मिश्रा यांनी “करवा चौथ साजरे करणार्‍या समलिंगी” बद्दल जाहिरात केल्याबद्दल त्यांनी सांगितले की डाबर हे “भविष्यात ते दोन पुरुषांना (हिंदू रितीरिवाजांनुसार) फेरा घेतांना दाखवतील.” अशी निंदा त्यांनी यावेळी केली. तसेच कंपनीला जाहिरात मागे घेण्याचे आदेश देण्यास पोलिसांना सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वास्तविक डाबरने आपल्या सौंदर्य उत्पादन फेम ब्लीचच्या जाहिरातीसाठी करवाचौथच्या मुहूर्तावर एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत दोन मुली एकमेकांसाठी करवा चौथ व्रत ठेवत असल्याचे दाखवण्यात आले होते. तर या जाहिरातीत दोन महिला त्यांची तयारी करताना दिसत आहे तर ते एकमेकांचे करवा चौथ हा व्रत उघडताना दिसत आहेत. या जाहिरातीतून एकप्रकारे लेस्बियन रिलेशनशिप किंवा लग्नाचा प्रचार करण्यात आला. हे पाहून सर्वसामान्यांनी या जाहिरातीला नापसंती देण्यात आली. या जाहिरातीसाठी लोकांनी डाबरला प्रचंड ट्रोल केले. या जाहिरातीबाबत सोशल मीडियाची दोन गट तयार झाले कारण अनेकांनी याला पाठिंबा दिला तर अनेकांनी बहिष्कार टाकण्याची मागणी केली.

तर या जाहिरातीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले.

ज्यात एका व्यक्तीने स्पष्टपणे लिहिले की, “सर्वसमावेशक जाहिराती केवळ हिंदू सण आणि परंपरांसह केल्या जाऊ शकतात हे पाहणे चांगले आहे कारण हिंदू धर्म भेदभाव करत नाही आणि सर्वांचा स्वीकार करतो.”

तर दुसर्‍या व्यक्तीने लिहिले की “डाबर हे ख्रिसमस किंवा ईद किंवा इतर कोणत्याही सणासाठी समान जाहिराती आणतो, का नाही? हिंदू सणांना लक्ष का करतात?”

डाबरवरील ट्रोलिंगचा हल्ला हा काही दिवसांनंतर झाला. मात्र या आधी जेव्हा फॅबइंडिया या सरकारच्या ‘मेड इन इंडिया’ दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारा आणखी एक जागतिक स्तरावर यशस्वी असलेल्या हा ब्रँड आहे. तर त्यांच्या जाहिरातीच्या संग्रहाला ‘जश्न-ए-रियाझ’ असे नाव देण्यात आले होते. तेव्हा या जाहिरातीला देखील ट्रोल करण्यात आले आणि हे कर्नाटकातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी केले होते.

फॅबइंडियानेही सोशल मीडियावरून ही जाहिरात काढून टाकली आहे.

कर्नाटकचे भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यानंतर टायर निर्माता कंपनी सीएटी लिमिटेडलाही ट्रोलचा सामना करावा लागला. “हिंदूविरोधी” संदेशासाठी ब्रँडची निंदा केली. त्याच बरोबर सप्टेंबरमध्ये, ‘कन्यादान’ विवाह परंपरेच्या संबंधात लिंग समानतेचे महत्त्व अधोरेखित केल्यामुळे, अभिनेत्री आलिया भट्टच्या क्लोदिंग ब्रँड मन्यावरची जाहिरात देखील रद्द करण्यात आली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dabur karva chauth ad after bjp ministers pressure dabur recalls karva chauth ad apologises scsm