बाप-लेकीचे नाते अत्यंत खास असते. वडील आपल्या मुलीला अगदी फुलासारंख जपतात. वडील आणि मुलीच्या नात्यातील आपलेपणा हा शब्दात व्यक्त करणे तसे अवघड आहे. सध्या अशाच एका बाप-लेकीचं सुंदर नाते दर्शवणारा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
आजच्या काळात अनेक पालक आपल्या मुला-मुलींबरोबर मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर मित्राप्रमाणे संवाद साधतात, मित्राप्रमाणे समजून घेतात आणि मित्राप्रमाणे त्यांच्याबरोबर मज्जा करतात, डान्स करतात. सध्या अशाच प्रकारे डान्स करता मज्जा करणाऱ्या बाप-लेकीचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
व्हिडिओ एका हळदीच्या कार्यक्रमातील असल्याचा दिसतो जिथे एक बाप-लेकीची जोडी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. गोरी गौरी मांडवाखाली…गाण्यावर दोघेही थिरकताना दिसत आहे. आसपासच्या लोकांची पर्वा न करता बाप लेक बिनधास्तपणे नाचत आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांनी प्रचंड आवडला आहे. mauu_alert नावाच्या इंस्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी पप्पा एकत्र हळदीमध्ये नाचताना…”
अनेकांनी कमेंट करून दोघांच्या सुंदर नात्याचे कौतुक केले. एकाने कमेंट करून सांगितले की,”नशीब लागतं वडीलांबरोबर नाचायला.”
दुसऱ्याने कमेंट केली की,”खरंच खूप छान नशीब आहे , तु तुझ्या पप्पांबरोबर एन्जॉय करते, वेळ घालवतेस अशीच आनंदी राहा, आणि पप्पांना पण आनंदी ठेव.”
हेही वाचा – Video : चूक कोणाची? प्रशासनाची की बेशिस्त प्रवाशांची? जीव धोक्यात टाकून रेल्वेत चढ-उतर
तिसऱ्याने कमेंट केली, मम्मी म्हणेल, “एकदम बाप्पाावर गेलीय..”
चौथ्याने लिहिले, “लेक बापसारखीच असते हे खरं आहे”