वय वाढतं तसं शरिराची काम करण्याची क्षमता कमी होते. पण काही लोक याला अपवाद आहेत. काही व्यक्ती वयाची ऐंशी ओलांडली तरी ते एकदम फिट असतात. घरातल्या एका कोपऱ्यात बसून आपल्या नातवांना गोष्टी सांगणाऱ्या आजी तुम्ही पाहिल्या असतील. पण वय झाल्यानं पाठीचा कणा वाकला तरी नातूसोबत खेळण्याचा उत्साह आजी ठेवत असतात. याच आजींना तुम्ही चॅलेंज दिलं तर काय होतं? हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमधल्या आजीचं टॅलेंट पाहून तुम्हीही आश्चर्य व्हाल.

आजींनी जर एखादी गोष्टी मनात ठरवली तर त्या आपल्या नातवांसाठी आकाश पाताळ एक करतात पण ती गोष्ट पूर्ण करतातच. हे मुलांना चांगलंच माहित असतं. असाच काहीसा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नातू आपल्या फिटनेससाठी गच्चीवर कसरत करत असल्याचे दिसून येत आहे. तो पुश-अप्स मारतो आणि वेट लिफ्टिंगही करतो. दरम्यान, ८० वर्षीय आजी काही कामानिमित्त टेरेसवर येतात. इकडे आजींना पाहून नातवानेही विनोदाच्या मूडमध्ये येऊन त्यांना फिटनेस चॅलेंज केलं. मात्र, यानंतर फ्रेममध्ये जे काही दिसले ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. नातवाने दिलेले चॅलेंज आजीने लगेच स्वीकारल्याचं दिसून येत आहे. पुढच्याच सेकंदाला आजी नातवाजवळ पोहोचतात आणि वजन उचलून नातवाला दिवसाढवळ्या चंद्र तारे दाखवतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : घराच्या छतावर लपून डान्स व्हिडीओ बनवत होती, अचानक झालं असं काही की…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : केअरटेकरला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावला हत्ती, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

वयाची ८० ओलांडलेल्या आपल्या आजीला वेटलिफ्टिंग करताना पाहून नातवाच्या पायाखालची जमिन सरकते. आजीला चॅलेंज खूप मोठा पंगा घेतल्याची भावना या नातवाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते. हैराण करून सोडणारा हा व्हिडीओ punjabi_industry__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो..! चालत्या बाईकवर केला डेंजरस स्टंट अन् धापकन खाली कोसळला…

हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला चार हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील शेअर करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्स वाचण्यासारख्या आहेत.

Story img Loader