पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजे दगडूशेठ गणपती हे सर्वांनाचा माहित आहे. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी १२ महिने गर्दी असते. अनेक भाविक लांबून लांबून बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. गणेशोत्सवामध्ये दगडूशेठ गणपतीच्या दर्शनसाठी खास मंदिराचा देखावा केला जातो. त्याचप्रमाणे वर्षभर सणवार आणि महत्त्वाच्या प्रसंगी दगडूशेठ मंदिराची खास सजावट केली जाते. दसऱ्याला फुलांने सजावटल केली जाते तर दिवाळीला सुंदर लाईटिंग केली जाते. नुकतेच त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त दगडुशेठ गणपती मंदिरात लक्ष दिव्यांची आरास करण्यात आली होती. सुंदर दिव्यांनी उजळलेल्या मंदिराचा सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.य

त्रिपुरारी पोर्णिमा

कार्तिक शुद्ध पोर्णिमेला त्रिपुरारी पोर्णिमा असेही म्हटले जाते. . अनेक ठिकाणी याला देव दिवाळी म्हटले जाते. या दिवशी प्रत्येक मंदिरातून विशेषत: शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावल्या जातात आणि मंदिर परिसर लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. फक्त शिवमंदिरातच नव्हे तर घरोघरी, अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.

हेही वाचा –Pune Video : “नॉन पुणेकर परतले!” पुण्यातील ट्रॅफिक वाढलं, VIDEO होतोय व्हायरल

u

त्रिपुरारी पोर्णिमेला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. अनेक ठिकाणी हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आरास करून अंधार नाहीसा केला जातो. सध्या दगडूशेठ मंदिराला अशाच प्रकारे दिव्यांची आरास करण्यात आली आहे. सोशल मीडियावर मंदिराचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे जे पाहून नेटकरी थक्क झाले आहे.

हेही वाचा –गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाच्या तब्बल ५२१ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट आणि कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर सजविण्यात आले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यांमध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.