Mumbai Dahi Handi 2023: आज सर्वत्र दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहीहंडी फोडण्यासाठी सर्वच गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. गल्लीपासून अगदी मोठमोठ्या मैदानात आज गोविंदा थर रचत आहेत. याच दहीहंडी पथकाचे अनेक व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कधी गोविंदा कडक थर रचत विक्रम करतात तर कधी त्यांचा प्रयत्न फेल जातो. यामध्ये अनेक व्हिडीओ गमतीशीरही असतात, कधी पथकाचा एक्काच वर राहतो तर कधी बेसला असणाऱ्या तरुणांचा तोल जातो. अशातच एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही मुलं घरच्या घरी गंमत म्हणून दहीहंडी साजरी करत होती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या मुलांकडे मडकं लावण्यासाठी दोरी नव्हती किंवा मडक लावायचं कसं हे त्यांना कळत नव्हतं. त्यामुळे मग एक मुलगा घराच्या बाल्कनित मडकं पकडून उभा राहिला. आता एकावर एक दोन थर लावून मडकं फोडायचं असा त्यांचा प्लॅन असल्याचं दिसत आहे. पण तेवढ्यात मडक पकडलेल्या तरुणाचा तोल गेला. खरं तर त्याची बाल्कनिट कोसळली. परिणामी मडक्याऐवजी तोच बाल्कनिला लोंबकळत राहिला. खरं तर कुठलाही अपघात ही एक गंभीर बाब असते. पण हा इतक्या क्षणार्थात घडला की पाहून आपोआप हसू येईल. यामध्ये नक्कीच या तरुणाला थोडफार लागलं असेल, मात्र त्याचे मित्र हे पाहून हसत आहेत, खरंतर त्यांनाही हसू अनावर झालं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ढाक्कुमाकुम ! नऊवारी साडी नेसून आजींनी डोक्यानं फोडली दहीहंडी; या वयातील जोश पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हा गेल्या वर्षीचा कोकणातील व्हिडीओ आहे, मात्र आज दहिहंडीनिमित्त पुन्हा एकदा व्हायरल झाल आहे. नेटकरीही गमतीशीर कमेंट व्हिडीओवर करत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahi handi 2023 in mumbai the boys are playing dahi handi in front of the house suddenly the balcony slab breaks down watch this video srk