Govinda Safety Precautions in Dahi Handi 2024 : आज कृष्ण जन्माष्टमी, भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात, पारंपरिक पद्धतीने साजरा होईल आणि रात्री १२ वाजता श्रीकृष्णाची पूजा केली जाईल; तर जन्माष्टमी उत्सवातील सर्वात आवडता भाग म्हणजे दहीहंडी (Dahi Handi ) उत्सव. तर यावर्षी जन्माष्टमी सोमवार २६ (आज) आणि मंगळवार २७ (उद्या) ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहीहंडी या उत्सवात वेगवेगळ्या ठिकाणांहून गोविंदा पथक येतात. ते पिरॅमिड बनवतात आणि गटातील एक सदस्य दही, दूध, लोण्याने सजवलेले मातीचे भांडे (हंडी) फोडण्यासाठी शीर्षस्थानी चढतो. जो संघ हे कार्य यशस्वीपणे पूर्ण करतो त्याला विजेता घोषित केले जाते आणि कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस मिळते. म्हणून मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांत दहीहंडी उत्सव खूप लोकप्रिय आहे. पण, अनेकदा हे थर रचताना अनेक दुर्घटना होतात, अनेकांना दुखापत होते.अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाय आणि खबरदारीचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा…Krishna Janmashtami 2024: चॉकलेटच्या बॉक्सपासून बनवा श्री कृष्णाचा पाळणा; VIDEO तून पाहा सोप्पी सजावट

दहीहंडी उत्सवादरम्यान कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची यादी पुढीलप्रमाणे…

१. वय आणि स्ट्रेंथ : दहीहंडीत (Dahi Handi ) सहभाग घेणाऱ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे हंडी फोडण्यासाठी थर तयार करणारे तरुण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावेत याची खात्री करावी. अपघात टाळण्यासाठी लहान मुलांना सगळ्यात वरच्या थरावर ठेवू नये.

२. सेफ्टी गियर : दहीहंडी (Dahi Handi ) फोडणाऱ्या प्रत्येक महिला व पुरुषांनी, हेल्मेट व पॅडिंग आदी सेफ्टी गियर वापरणे आवश्यक आहे. ही सावधगिरी बाळगल्यास जखमी होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होईल.

३. उंचीची मर्यादा : जास्त धोकादायक पिरॅमिड किंवा थर रचणे टाळा. हंडी बांधण्याची उंची सेट करा. थोड्या कमी उंचीवर हंडी बांधा आणि तुमचं दहीहंडी फोडण्याचे लक्ष पूर्ण करा.

४. प्रशिक्षित संघ : हंडी फोडण्यापूर्वी संपूर्ण संघाला चांगले प्रशिक्षण दिले पाहिजे. योग्य प्रशिक्षणामुळे अपघाताची शक्यता कमी होते आणि सण आनंदात साजरा होईल.

५. पर्यवेक्षण : अनुभव असलेल्या व्यक्तींद्वारे कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले जात आहे ना याची खात्री करा. संघाकडून सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाईल, याची खात्री करून या व्यक्ती सहभागींना मार्गदर्शन देऊ शकतात.

६. प्रथमोपचार : किरकोळ दुखापतींवर त्वरित उपचार करण्यासाठी कार्यक्रमादरम्यान एक प्रथमोपचार किट जवळ ठेवा. अपघातांच्या बाबतीत वैद्यकीय सहाय्यासाठी उपयोग होऊ शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahi handi 2024 here are six safety precautions govindas should follow for those participating in janmashtami celebrations asp