Dahi Handi 2024 poster demanding justice: पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात काही वर्षांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. धक्कादायक म्हणजे नराधमांनी कोवळ्या, अजाण जीवांनाही सोडले नाही. शाळेत त्या चिमुकल्या ज्याला दादा, दादा म्हणत होत्या, त्याच नराधमाने त्यांना ओरबाडले. बदलापूर घटनेमुळे राज्य हादरले. आंदोलने झाली, सरकारकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आले. पण राज्यात महिला आणि चिमुकल्यांच्या शरीरांशी कुस्करण्याचा खेळ करण्याची ही पहिलीच गोष्ट नाही. याआधीही अशा प्रकारची हीन कृत्ये घडली आहेत. मग यामध्ये नुकतेच घडलेले बदलापूरमधले प्रकरण असेल किंवा कोलकातामधील; एकंदरीत महिला कुठेच सुरक्षित नाही.

या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आज दहिहंडीच्या निमित्ताने आपल्या संतापाचा आवाज पोहोचविण्यासाठी एका चिमुकल्यानं सरकारला जाब विचारला आहे. या चिमुकल्याच्या पाटीने सर्वांचं लक्ष वेधलं असून व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

winter in pune
Pune Video : पुण्यातील हिवाळा कधी अनुभवला का? VIDEO होतोय व्हायरल
shocking video of girl's skirt was torn on road unknown person helped her while her friend laughed
…म्हणून मैत्री विचार करून करा! भररस्त्यात तरुणीचा स्कर्ट…
dog is sitting on a bicycle with owner
VIRAL VIDEO : ‘हा तर रायडर!’ गॉगल लावून, जॅकेट घालून मालकाबरोबर ऐटीत बसला गाडीवर; श्वानाच्या लूकवर नेटकरीही फिदा
7-Yr-Old Sharvika Mhatre Collects Soil from 108 Gadkille of Chhatrapati Shivaji Maharaj
७ वर्षांच्या चिमुकलीने जमा केली शिवरायांच्या १०८ गडांची पवित्र माती, Video होतोय व्हायरल
UP: Brave Railway Cop Saves Woman Who Got Stuck Between Platform & Moving Train At Kanpur Station
Shocking: ट्रेन सुरु झाली अन् मुलं खालीच राहिली; लेकरांसाठी उतरायला गेलेली आई थेट रुळावर पडली; शेवट पाहून अंगावर येईल काटा
Fight over land property between two families more than 12 people injured in mp shocking viral video
एवढा पैसा कुठे घेऊन जाणार? जमिनीच्या वादावरून वयोवृद्धावर काठीने केला हल्ला, वाचवायला तरुणी मध्ये आली पण…, पाहा थरकाप उडवणारा VIDEO
Optical Illusion Puzzle If You Were Trapped In A Fire Which Option Would You Choose To Save Your Life 1 2 3 Or 4
आगीतून वाचण्यासाठी १ २ ३ की ४ कोणता पर्याय आहे योग्य? ९९ टक्के लोकांना उत्तर देता आलं नाही, तुम्हाला जमतंय का? पाहा
A woman recreated a Bollywood song for her husband
VIRAL VIDEO: क्या हुवा तेरा वादा? लग्नाच्या वाढदिवसादिवशी ऑफिसचं काम करताना पाहून बायकोने रिक्रिएट केलं ‘हे’ गाणं

एका रात्रीत सरकार बदलते, मग एका दिवसात फाशी का नाही?

वरळीच्या जांभोरी मैदानात आज हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. यामध्ये एका बाळ गोपाळाच्या हातात असलेल्या पाटीने अनेकंचे लक्ष वेधले आहे. बलात्कार पीडीतांना न्याय मिळवून देण्याचा संदेश त्यावर आहे. “जर सरकार एका रात्रीत बदलतं, नोटबंदी एका रात्रीत होते, मग महिलांवर बलात्कार करणार्‍यांना एका रात्रीत फासावर चढवलं जाऊ शकतं नाही?” असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या बॅनरवर लिहिलं होतं, एका रात्रीत नोटबंदी, एका रात्रीत लॉकडाऊन, “एका रात्रीत सरकार बदलते, मग एका रात्रीत बलात्कारीला फाशी का होऊ शकत नाही? आम्हाला कँडल मार्च नको आम्हाला न्याय हवा आहे साहेब.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Shocking VIDEO: सातव्या थरावरुन तोल गेला अन् तो…; ठाण्यात दिघे साहेबांच्या दहीहंडीतला थरार कॅमेऱ्यात कैद

बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?

बदलापूर पूर्वमध्ये एका नामांकित शाळेत शिकत असलेल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने १६ ऑगस्टला शाळेमध्ये जाण्यास नकार दिला होता. घरच्यांनी सांगितल्यानुसार ती शाळेत जायचं म्हटलं की प्रचंड घाबरली होती. प्राईव्हेट पार्टच्या ठिकाणी तिला त्रास होत असल्याचं तिने घरी सांगितलं. त्यानंतर घरच्यांनी तिला दवाखान्यात नेलं, त्यावेळी डॉक्टरांनी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची माहिती दिली.

कोलकातामध्ये नेमकं काय घडलं ?

कोलकाता शहरात एक घटना घडली अन् देश हादरला… कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संजय रॉय असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा रुग्णालयातील कर्मचारी नव्हता, पण तो सतत या रुग्णालयात येत होता. शुक्रवारी सकाळी प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. तिच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, जेवल्यानंतर डॉक्टर काही वेळ विश्रांतीसाठी हॉलमध्ये गेली होती. या काळात रात्री ३ ते पहाटे ६ च्यादरम्यान ही घटना घडली.