Dahihandi Viral Video :  गोविंदा आला रे आला च्या जयघोषात आज दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. दहीहंडी निमित्त अनेक बालगोपाळ तसेच गोविंदा पथक आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळणार आहेत. ठाण्यासह मुंबई येथील दही हंडी उत्सव नेहमीच लक्षवेधी आणि चर्चेचा असतो. त्यामुळे यंदा दहीहंडी पथकांकडून थरांवर थर हे पाहायला मिळणार असले तरी दहा थर कोण लावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत. या उत्सवात आता मुलीही मागे नाहीत. मुलींची गोविंदा पथकेही आता मोठ्या प्रमाणावर तयार झाली आहेत. महिनाभर आधीपासूनच दहीहंडीची तयारी आणि सराव सुरु होतो. याच उत्साहात भर पाडणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील सर्वांत खास गोष्ट म्हणजे नऊवारी नेसलेल्या एका आजीबाईंनी थरावर चढून ही दहीहंडी फोडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्व महिला या दहीहंडी फोडण्यासाठी जमल्या आहेत. यावेळी या महिलांनी २ थर लावले आहेत. तर हंडी फोडण्यासाठी या आज्जी दुसऱ्या थरावर चढल्या आहेत. व्हिडीओ पाहताना सुरुवातीला या आजी पडत आहेत की काय अशी भीती वाटते. मात्र दुसऱ्याच क्षणाला त्या आपल्या डोक्याने ही हंडी फोडतात. हे दृश्य पाहून भल्याभल्यांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल हौशेला मोल नाही..या वयातही आज्जींचा उत्साह पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. हा गेल्यावर्षीचा कोकणातील व्हिडीओ आहे, मात्र आज दहिहंडीनिमित्त पुन्हा एकदा व्हायरल झाल आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गोविंदा आला रे आला …, मुंबईतील ‘या’ आहेत पाच प्रसिद्ध मानाच्या दहीहंड्या; नक्की भेट द्या!

 उंचच उंच थर लावून दहीहंडी फोडण्याची मजा काही औरच असते. अन् त्यामध्ये जर का रिमझिम पाऊस असेल तर मग काय विचारायलाच नको. शिवाय जागोजागी आयोजित केलेल्या दही हंडी स्पर्धांमुळे गोविंदा पथकांमधील उत्साह आणखीनच वाढलाय. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahihandi 2023 viral video an old lady broke dahihandi with her head while wearing nauvari saree you will also be amazed by the vigor of this age srk