Dahihandi Theme For The Dohale Jevan Baby Shower : आई होणे हा महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. कुटुंबातील गरोदर महिलेचे खूप कोडकौतुक केले जाते. कुणीतरी येणार येणार गं, असे म्हणत डोहाळजेवणाचा कार्यक्रम ठेवाला जातो. या कार्यक्रमासाठी झोका, धनुष्यबाण, फुलांची सजावट व पारंपरिक गाणी लावण्यात येतात. पण, हल्ली वेगवेगळ्या थीमवर आधारित डोहाळजेवणाचा कार्यक्रम ठेवला जातो. सोशल मीडियावर मुंबईतील डोहाळजेवणाच्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क दहीहंडी सणावर आधारित थीमवर डोहाळजेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यातून मुंबईकरांचे दहीहंडी सणावर असलेले अतूट प्रेम दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या अनोख्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ अनेक युजर्सनाही चांगलाच आवडला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दहीहंडी स्पेशल डोहाळजेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी पाहुण्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी महिलांनी होणाऱ्या आईचे औक्षण करून ओटी भरण्यात आली. विशेष म्हणजे कार्यक्रमाची सर्व सजावट खास भगवान श्रीकृष्णावर करण्यात आली होती. यावेळी मुलगा होणार की मुलगी हे ओळखण्यासाठी एक छोटासा मजेशीर खेळ खेळण्यात आला. त्यासाठी छताला दोन सजवलेल्या हंडी बांधण्यात आल्या होत्या.

Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
kangana ranaut makeup indira gandhi prosthetic make up
कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ
allu arjun pushpa 2 collection box office day 31 and varun Dhawan baby john struggles to mint even 1 crore
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ने शनिवारी केली ‘इतकी’ कमाई
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic dance on chaar kadam Song
Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा सुशांत सिंह राजपूत आणि अनुष्का शर्माच्या ‘या’ गाण्यावर रोमँटिक डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Ileana DCruz expecting second baby
Video: लग्नाआधीच प्रेग्नेन्सीमुळे राहिली चर्चेत, ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई? ‘तो’ फोटो व्हायरल

त्यातील एका हंडीत मुलगी आणि दुसऱ्यात मुलाची छोटी प्रतिकृती होती. जोडप्याने एक हंडी निवडून, ती फोडायची होती. अखेर दोघांच्या मताने त्यांनी एक हंडी निवडली आणि त्यातून मुलाची प्रतिकृती खाली पडली. त्यावरून मुलगा जन्माला येईल, असे मानत, खास कृष्ण जन्मला हे गाणे वाजवून जोडप्याने नाचण्याचा आनंद घेतला. इतकेच नाही तर यावेळी खास दहीहंडीची गाणी वाजवून, त्यावर काही तरुणांनी, बोल बजरंग बली की जय, असे म्हणत नाचण्याचा आनंद घेतला.

विशेष म्हणजे केवळ तरुणाच नाही, तर त्यांच्यात एका वृद्ध काकादेखील आनंदाने नाचताना दिसले; ज्यांना फॉलो करीत इतर तरुण पाहुणे मंडळी नाचत होती. त्यानंतर जोडप्याने थीमनुसार खास फोटो सेशनदेखील केले. मुंबईत दहीहंडीच्या वेळी ज्या प्रकारे पारंपरिक गाणी म्हणत तरुण नाचतात अगदी तशाच प्रकारे ही तरुण मंडळी या कार्यक्रमात नाचत होती. यावेळी कार्यक्रमात एक वेगळाच माहोल क्रिएट केला.

Read More Trending News : साफसफाईची जीवघेणी हौस! कांजूरमार्गमधील इमारतीतील धडकी भरवणारे दृश्य; Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

या अनोख्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्सही त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, खूप मस्त यार, किती भाग्यवान आहे ते बाळ. त्याचे किती लाड होतील मस्त. मी आतुर आहे तो जेव्हा जन्मला येणार तेव्हाचा व्हिडीओ बघण्यासाठी. किती धमाल असेल.

Story img Loader