आपले प्राण वाचवणा-याला कधीच विसरू नये ही शिकवण दलाई लामांनी आपल्या अनुयायांना दिली आणि तेसुद्धा ही शिकवण कधीच विसरले नाही. म्हणूनच तर १९५९ साली त्यांना संरक्षण देणा-या सैनिकाची इतक्या वर्षांनी भेट झाल्यानंतर ते भावूक झाले आहेत.
आसाम सरकारकडून गुवाहटीमध्ये ब्रम्हपुत्र फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते यासाठी दलाई लामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ५८ वर्षांपूर्वी त्यांना संरक्षण देणा-या नरेन चंद्र दास या सैनिकाला पाहून ते भावूक झाले. चीनने तिबेट ताब्यात घेतल्यावर दलाई लामा आपल्या अनुयायांसोबत भारतात आले त्यावेळी आसाम रायफल्सच्या पाच जवानांनी त्यांना सुरक्षा दिली होती. त्यातल्या एका सैनिकाची ५८ वर्षांनंतर दलाई लामांशी भेट झाली. त्यांना पाहताच लामांनी आलिंगन दिले त्यांचे अश्रूही अनावर झाले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दलाई लामा आणि सैनिक भेटीचा हा फोटो शेअर केला होता. दलाई लामांना तिबेटवरून भारतात सुरक्षित आणण्याची जबाबदारी आसाम रायफल्सच्या ५ सैनिकांवर होती. ही जोखीम यशस्वीरित्या पार पाडत नरेन चंद्र दास आणि इतर सैनिकांनी त्यांना सुरक्षित भारतात आणले. ५८ वर्षांनी भेट होताच दलाई लामांनी आलिंगन देत ” सुरक्षा देणा-या सैनिकाला इतक्या वर्षांनंतर भेटून मला आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Can't stop tears. HH Dalai Lama met Assam Rifles jawan Naren Das, a member of Assam Rifles that escorted him when he entered India in 1959. pic.twitter.com/WKIAOhYGrd
— Kiren Rijiju (@KirenRijiju) April 2, 2017