गोरिला म्हटलं की डोळ्यासमोर अनेक हॉलिवड चित्रपट येतात. हिंस्त्र दिसणारा प्राणी भावनाप्रधान कसा होतो. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी जीवावर कसा उदार होतो, हे अनेक हॉलिवडूपटात दाखवण्यात आले आहे. हे वाचल्यानंतर अनेक चित्रपटांची नावे आठवली असतील. अनेक चिमुकल्यांबरोबर मोठ्यांचाही आकर्षण ठरलेला हा प्राणी जेव्हा प्रत्यक्षात समोर येतो, तेव्हा भल्याभल्यांची भितीने गाळण उडताना दिसते. आपण त्याच्याबरोबर हवा तसा गोंधळ घालू शकत नसलो तरी त्याने केलेल्या करामती मात्र भरपूर एन्जॉय करू शकतो. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ यु ट्यूबवर पाहिला आहे. अमेरिकेतील डल्लास येथील एका प्राणिसंग्रहालयातील वेस्टर्न लाऊलँड नावाच्या १४ वर्षांचा गोरिला चिमुकल्यांसाठी असलेल्या पुलमध्ये जबरदस्त ओप्पा झोला स्टाइल डान्स करत असल्याचे या व्हिडिओत दिसतोय.
याच आठवड्यात डल्लास प्राणिसंग्रहालयाने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात वेस्टर्न लाऊलँड लहान मुलांसाठी असलेल्या पुलमध्ये पहिल्यांदा उभा राहतो आणि नंतर मस्तपैकी गोल गोल फिरत डान्स करताना दिसतोय. एका आठवड्यात लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.