सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होऊन जातो. लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्ध लोकांचे डान्स व्हिडीओ तर खास चर्चेचा विषय ठरतात. अशा व्हिडीओंना आवडीने पाहिले जाते. सध्या एका तीन वर्षाच्या मुलीचा डान्स प्रचंड व्हायरल होतोय. या चिमुकलीचा बहारदार डान्सचा व्हिडीओ एकदा बघून तुमचं मन भरणार नाही, हे मात्र नक्की. तिच्या डान्स स्टेप्स आणि मूव्ह्स पाहून सोशल मीडियावर तिला ‘ज्यूनिअर शकीरा’ असं म्हटलं जातंय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या २० सेकंदाचा हा व्हिडीओ एका पार्कमधला दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये तीन ते पाच वर्षाची मुलं दिसत आहेत. ही सर्व किलबील मंडळी कोलंबियाची सिंगर शकीराच्या एका गाण्यावर थिरकताना दिसून येत आहेत. या किलबील मंडळींमध्ये एक तीन वर्षाची मुलगी असा जबरदस्त डान्स करतेय की पाहणारे केवळ पाहतच राहीले. ही चिमुकली फेमस सिंगर शकीराच्या गाण्यावर एक एक डान्स स्टेप्स हुबेहुब कॉपी करताना दिसून येतेय. या व्हिडीओमध्ये डान्स करत असलेल्या मुलींचे मूव्स पाहून एखादी प्रोफेशनल डान्सर डान्स करत असल्याचा भास होतो. या व्हिडिओमधील मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव कौतुक करण्यासारखे आहेत.
हा व्हिडीओ MhutniKeMemes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करून केवळ दोनच दिवस झाले आहेत तर आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. या मुलीच्या डान्सचे नेटिझन्सनी खूपच कौतुक केले आहे. ही मुलगी इतका सुंदर डान्स करत आहे की त्याला पाहून शकीराला देखील विसरून जाल. कोणीतरी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडिओला नेटिझिन्सनी खूप चांगली पसंती दिली आहे. इतक्या लहान वयात मुलीने केलेला हा जबरदस्त डान्स पाहून प्रत्येक जण हैराण होताना दिसून येत आहे.