Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात.लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करतात आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात.
सध्या असाच एक डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे वडील मुलगा भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोक त्यांचे चाहते होईल. वडील मुलाचे नाते हे जगावेगळे असते. त्यांच्या नात्यात जिव्हाळा, आपुलकी आणि मैत्री दिसून येते. एका कार्यक्रमात बापलेकाची अशीच हटके ट्युनिंग दिसून आली. वडील मुलाच्या डान्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. (dance video a father and a son amazing dance no one can be better partner than father video goes viral)
हेही वाचा : थार चालकाचे भररस्त्यात धक्कादायक कृत्य, कारच्या छतावर टाकली माती अन्…Video व्हायरल होताच पोलिसांची कारवाई
वडील मुलाचा जबरदस्त डान्स
हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दोघे वडील मुलगा भन्नाट डान्स करताना दिसेल. काळ्या रंगाचा ड्रेस आणि काळा चष्मा घालून हटके डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. मुलापेक्षा वडील अतिशय ऊर्जेने डान्स करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. सोनी दे नखरे या आयकॉनिक गाण्यावर ते डान्स करत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या मुलाची तर काही लोकांना त्याच्या वडीलांची आठवण येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
aminaaly__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वडील मुलाचा डान्स”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काकांनी मन जिंकले” तर एका युजरने लिहिलेय, “काकांनी मुलापेक्षा खूप छान डान्स केला” आणखी एका युजरने लिहिलेय, “वडील खूप चांगले डान्सर आहे वाटतं” एक युजर लिहितो, “काकांची ऊर्जा पाहून थक्क झालो” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जवळपास १ लाख ९० हजार लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला