Dance video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होतात. कधी एखाद्या ट्रेडिंग गाण्यावर लोक रिल्स व्हिडीओ बनवतात तर कधी एखाद्या जुन्या गाण्यावर लहानांपासून वृद्धापर्यंत अनेक जण डान्स करताना दिसतात. काही डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण भररस्त्यावर त्याच्या पत्नीविषयी प्रेम व्यक्त करत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणत्याही महिलेला वाटेल की नवरा असावा तर असा. हा डान्स व्हिडीओ पाच लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. (dance video beats Hrithik Roshan a young guy dance so gracefully for his wife to express love on a street video goes viral)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हालाा रस्त्यावर काही तरुण मंडळी डान्स करताना दिसेल. या व्हिडीओत एक तरुण त्याच्या पत्नीबरोबर डान्स करताना दिसतो. त्यानंतर तो एकटा डान्स करतो आणि डान्सच्या लिरिक्सच्या मदतीने पत्नीला तिच्याविषयी असलेले प्रेम आणि मनातील भावना व्यक्त करताना दिसतो. हृतिक रोशनचे लोकप्रिय गाणं “देखा तुमको जबसे, बस देखा तुमको, यारा..तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा..
यूह नजरे ना फेरो तुम, मेरे हो, मेरे तुम..” या गाण्यावर डान्स करताना दिसतो. त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. या तरुणाची पत्नी सुद्धा डान्स पाहून थक्क होते. या नवरा बायकोमधील केमिस्ट्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांना प्रेम व्यक्त करण्याची तरुणाचा अनोखी अंदाज आवडला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
jaishree___tanwar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय,”जेव्हा तो सार्वजानिक ठिकाणी प्रेम व्यक्त करायाला घाबरत नाही..” या तरुणाच्या पत्नीचे हे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जेव्हा पुरुष महिलेपेक्षा जास्त प्रेम करतो” तर एका युजरने लिहिलेय, “फक्त हा क्षण पाहिजे आयुष्यात.. बाकी काहीही नको” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावाने पूर्ण बॉलीवूड एकाच डान्समध्ये दाखवून दिले” अनेक युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.