आपलं लग्न झालं याचा आनंद प्रत्येकाला असतो, जो नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरील हास्यातून झळकतो. पण काही नवरा-नवरी असे असतात जे हा आनंद फक्त हास्यातून दाखवत नाही. तर त्यांना खुलेपणाने व्यक्त करायला आवडतो. अशाच एका नवदाम्पत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक खास क्षण असतो. हा गोड क्षण कायम आठवणीत रहावा यासाठी प्रत्येकजण काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात बिनधास्त डान्स करत हा दिवस साजरा करतात. हल्ली सगळीकडे याचा ट्रेंडच सुरू आहे. हाच ट्रेंड फॉलो करत या व्हायरल व्हिडीओमधल्या नवरीने लग्नात धांसू डान्स केलाय.
आणखी वाचा : मोबाईलच्या नादात पोटच्या गोळ्यालाच विसरली, VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल
या व्हिडीओमध्ये नवरीचा परफॉर्मन्स इतका जबरदस्त होता की आपल्या होणाऱ्या पत्नीला डान्स करताना पाहून नवरदेव बघतच राहिला. नवरीने जे ठुमके लावले ते पाहून लग्नमंडपातील वऱ्हाडी मंडळी केवळ बघतच राहिले. सर्व पाहूणे मंडळी या नवरी नवरदेवाला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसून आले. नवरीचा धांसू परफॉर्मन्स पाहून व्हिडीओमध्ये दुसऱ्याच कुणाची एन्ट्री होते. स्टेजवर येऊन हा व्यक्ती नवरीसोबत थिरकू लागतो. बाजुला नवरदेव उभा असताना ही नवरीबाई मात्र दुसऱ्याच कुणासोबत डान्स करण्यात मग्न झाली. या दोघांनी जो डान्स केलाय तो पाहून सारेच जण त्यांचे फॅन होऊ लागले आहेत. लग्न होत असल्याचा आनंद या नवरीबाईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : दुकानदारावर फिदा झालेल्या ग्राहकाने दिले ३८ हजारांचे बक्षीस
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : जीवाची पर्वा न करता या व्यक्तीने कोब्राला वाचवले, VIRAL VIDEO एकदा पाहाच
नवरीबाई आणि तिच्यासोबत डान्स करणाऱ्या व्यक्तीचा रॅगिंग डान्स लोकांना खूपच आवडला आहे. लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. इतकंच नाही तर हा व्हिडीओ पाहून अनेकजण हसत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘वेडाअबाउट’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला शेकडो लोकांनी लाइक केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक या व्हिडीओवर कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.