Disabled Girls Dance Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. प्रसिद्धी किंवा स्वत:च्या आनंदासाठी अनेक लोक मेट्रोत, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर डान्स करताना आपल्याला दिसतात.
काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘तांबडी चांबडी’ ही गाणी खूप चर्चेत आली आहेत. त्यावर लाखो लोकांनी बनवलेल्या रील्स पाहायला मिळत आहेत. पण, सध्या ‘मदनमंजिरी’ या मराठी गाण्यावर दोन अपंग मुली थिरकल्या आहेत, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय. सध्या या चिमुकलींच्या डान्सची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. नेमकं काय केलंय या मुलींनी ते जाणून घेऊ…
अपंग मुलींचा धमाकेदार डान्स
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची सुरुवात दोन अपंग मुलींच्या जबरदस्त एन्ट्रीने होते. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोन अपंग मुली व्हीलचेअरवरून स्टेजवर येतात आणि मदनमंजिरी या मराठी गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स करतात. व्हीलचेअर बसूनदेखील दोघी अगदी उत्तम नृत्य सादर करतात. या दोन्ही चिमुकलींचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी त्यांच्या या डान्सचं खूप कौतुकदेखील केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @vishwamarathisammelanofc या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मदनमंजिरी या गाण्यावर दोन दिव्यांग चिमुकलींचे सुंदर लावणी नृत्य’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
दोन चिमुकलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “सलाम, तुमच्या जिद्दीला! अप्रतिम! खूप छान”. दुसऱ्याने, “अप्रतिम! सुंदर डान्स केला. दोघीही ग्रेट”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “यांच्याकडून खूप काही शिकता येते आयुष्यात”. एकाने, “आतापर्यंतची सर्वांत सुंदर रील! खूप छान”, अशी कमेंट केली.