Viral video: कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात रांगडी अन् मनमौजी लोकं. आपल्या दिलखुलास वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजी आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजी- आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापुरातला हा व्हिडीओ असून या व्हिडीओमध्ये आजी-आजोबा बिनधास्तपणे डान्स करत आहेत. एका कार्यक्रमात खानदेशी पद्धतीने हालगी वाजत असताना यात अनेकजण हलगीच्या तालावर नाचताना दिसत आहे. मात्र या अनेकजणांमध्ये एक आजी-आजोबा आहेत,ज्यांनी अफलातून ताल धरला आहे. आजोबांना पाहताच व्हिडीओतील आजीबाईंनाही डान्समध्ये भाग घेतला. त्यानंतर आजीनेही आजोबांसोबत ठुमके घ्यायला सुरुवात केली आहे. आजीने डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या दोघांनाही जोरदार दाद दिली आहे. या एका व्हिडीओमुळे आजी अन् आजोबा फेमस झाले आहेत.

आजी-आजोबा जबरदस्त थिरकले

या आजोबांचे नेमके वय माहित नसले तरी ते ७० च्या आसपास असेल असा अंदाज आहे. आजी-आजोबा अगदीच मजेदार डान्स करताना दिसत आहेत.या वयातही हे दोघेही इतक्या उत्साहाने करत असलेला डान्स पाहून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. या दोघांच्याही चेहऱ्यावर या वयातही असलेला उत्साह आपल्यालाही एनर्जी देणारा ठरू शकतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी

आजींचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ‘@media_control_” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,”घुगुळाचा नाद मावशी जोमात” असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच हजारोच्या संख्येने व्हिडिओला आतापर्यंत ६४ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dance video done by grandparents in kolhapur on marathi song halagi tune is currently going viral on social media srk