Viral video: सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अस्सल खानदेशी आजी-आजोबांचा डान्स

या व्हिडीओमध्ये आजी-आजोबा बिनधास्तपणे डान्स करत आहेत. एका कार्यक्रमात खानदेशी पद्धतीने हालगी वाजत असताना यात अनेकजण हलगीच्या तालावर नाचताना दिसत आहे. मात्र या अनेकजणांमध्ये एक आजी-आजोबा आहेत,ज्यांनी अफलातून ताल धरला आहे. आजोबांना पाहताच व्हिडीओतील आजीबाईंनाही डान्समध्ये भाग घेतला. त्यानंतर आजीनेही आजोबांसोबत ठुमके घ्यायला सुरुवात केली आहे. आजीने डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या दोघांनाही जोरदार दाद दिली आहे.

आजी-आजोबा जबरदस्त थिरकले

या आजोबांचे नेमके वय माहित नसले तरी ते ७० च्या आसपास असेल असा अंदाज आहे. आजी-आजोबा अगदीच मजेदार डान्स करताना दिसत आहेत.या वयातही हे दोघेही इतक्या उत्साहाने करत असलेला डान्स पाहून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. या दोघांच्याही चेहऱ्यावर या वयातही असलेला उत्साह आपल्यालाही एनर्जी देणारा ठरू शकतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: पुणेरी दणका! आजोबांनी फुलं चोरणाऱ्यांना घडवली जन्माची अद्दल; पुणेरी पाटी वाचून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबात माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ marathi_vadal001 यांनी इन्स्टाग्राम अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला एकूण लाखो नेटकऱ्यांनी पाहिले आहे.याआधीही या कपलच्या वेगवेगळ्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे आपल्या डान्समुळे अनपेक्षितपणे हे आजी-आजोबा सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एकानं कमेंट केली आहे की, “आजोबांचा विषय हार्ड” तर आणखी एकानं कमेंट केली आहे की, “अस्सल खानदेशी आजोबा काही ऐकत नाही”