Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजोबा बिनधास्तपणे डान्स करत आहेत. एका लावणीच्या कार्यक्रमात आजोबांनी जबरदस्त असा डान्स केला आहे. एवढ्या तरुणांमध्ये आजोबांचा उत्साह हा पाहण्यासारखा आहे. “खेळताना रंग बाई होळीचा होळीचा” या गाण्यावर आजोबांनी चांगलाच ठेका धरलाय. आजोबांच्या आजूबाजूला तरुण दिसत आहेत, ते आजोबांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. आजोबांनी नाचताना चष्मादेखील लावला आहे. या आजोबांचे नेमके वय माहीत नसले तरी ते ७० च्या आसपास असेल असा अंदाज आहे. या वयातही हे इतक्या उत्साहाने करत असलेला डान्स पाहून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. या आजोबांच्या चेहऱ्यावर या वयातही असलेला उत्साह आपल्यालाही एनर्जी देणारा ठरू शकतो.

Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गणपती मिरवणुकीसाठी दिली अशी जाहिरात की वाचून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ janardan_bhangare_ यांनी इन्स्टाग्राम अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला एकूण लाखो नेटकऱ्यांनी पाहिले आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं कमेंट केली आहे की, “आजोबांचा विषय हार्ड”, दुसऱ्या युजरने कमेंट केलीय की, “याला वय लागत नाही नाद लागतो”, तर आणखी एकानं कमेंट केली आहे की, “आजोबा काही ऐकत नाही, या वयातदेखील आजोबांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे”, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.

Story img Loader