सोशल मीडियावर म्हणजे असंख्य व्हिडिओचा खजिनाच आहे. यावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी आश्चर्याचा धक्का देणारे असतात तर कधी पोट धरुन हसायला लावतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक हसत आहेत. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ मात्र काहीसा वेगळा आहे. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये दोन महिलांनी प्रसिद्धीसाठी चक्क म्हशीवर उभं राहून डान्स केला. या उत्साही महिलांनी गाण्यावर धडाकेबाज डान्स करत आहेत. पण तेवढ्यात म्हैस पुढे गेली अन् पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही देखील डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन महिला साडीमध्ये म्हशीवर उभं राहून डान्स करत आहेत. राजस्थानमधील एका गावातील हा व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे डान्स करतानाचे या काकूंचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. काकूंची डान्स करतानाची एनर्जी भल्याभल्या डान्सर्सना लाजवेल अशी आहे. या काकू डान्स करताना उड्यासुद्धा मारत आहेत. तसेच गाण्याच्या तालावर चेहऱ्यावर मजेदार हावभावसुद्धा करत आहेत.
prince__rajasthani नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खूप जुना असून,अजूनही तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून, नेटकऱ्यांना हसू आवरेनासे झाले आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मुंबईत मंदिराबाहेर बसलाय माणसातला देव! ‘हा’ VIRAL VIDEO पाहून तुम्हीही हेच म्हणाल…
सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या खूप पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.