Woman dance in mumbai local: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. प्रसिद्धीसाठी किंवा स्वत:च्या आनंदासाठी अनेक लोक मेट्रोत, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर डान्स करताना आपल्याला दिसतात.
काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘पीलिंग्स’, ‘तांबडी चांबडी’, ‘आज की रात मजा हुस्न का…’ ही गाणी खूप चर्चेत आली आहेत. त्यावर लाखो लोकांनी रील्स बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. पण, सध्या एका महिलेने मुंबई लोकलमध्ये आगरी-कोळी गाण्यावर डान्स केला आहे, जो तुफान व्हायरल होतोय.
महिलेचा डान्स व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला चालू लोकल ट्रेनमध्ये “बाया बांगुऱ्या मागतान रं” या आगरी-कोळी गाण्यावर डान्स करताना दिसतेय. गाण्याच्या सुरुवातीला ट्रेनमधील तिच्या मैत्रिणीही तिला या डान्समध्ये साथ देताना दिसत आहेत. मुंबई लोकलमध्ये साडी, नथ आणि नट्टापटा करून ही महिला छान डान्स करताना दिसत आहे. अगदी हुबेहूब डान्स स्टेप करत महिलेने सगळ्यांचं मन जिंकलंय.
हा व्हिडीओ @sawantvibhuti911 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत. हे गाणं सध्या चर्चेत असल्यामुळे त्यांनी हा डान्स केलाय असं त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितलंय.
हेही वाचा… सिगारेट घेतली अन्…, एका रीलसाठी तिघींनी ओलांडली मर्यादा! VIDEO पाहून बसेल धक्का
युजर्सच्या प्रतिक्रिया
महिलेच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूपच छान, एक्स्प्रेशन्स अप्रतिम आहेत” तर दुसऱ्याने “एक नंबर ताई” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “खूपच सुंदर गाणं आणि त्यावर चालू ट्रेनमध्ये एवढं सुंदर नृत्य वा”, तर “खूप छान ताईसाहेब”, “एवढ्या माणसांमध्ये हिंमत करणे हेच खूप आहे”, “मिळेल त्या वेळेत, आनंद साजरा करावा”, अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत.