Uncle Aunty Dance: दररोज सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर; काही जण फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी अशा विविध प्रकारच्या डान्सचा आधार घेत असतात; तर काही जण फक्त स्वत:च्या मजा, आनंदासाठी तो क्षण एन्जॉय करत असतात.

आनंदी राहण्यासाठी वय, वेळ, काळ बघितला जात नाही असं म्हणतात. त्या त्या क्षणी मनाला वाटेल ते करता आलं पाहिजे, हवं तसं जगता आलं पाहिजे. यामुळेच आपण स्वत:ला खूश ठेवू शकतो. याचंच भक्कम उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारे काका-काकू. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक काका-काकू जगाची पर्वा न करता बेभान डान्स करताना दिसतायत. त्यांचा डान्स पाहून नेटकरीही खूश झाले आहेत.

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Elderly man beaten by youth Netizens
‘त्यावेळी तुमचा बाप नाही आठवला का रे?’ तरुणांनी केली वृद्ध व्यक्तीला मारहाण; VIDEO पाहून नेटकरी भडकले

हेही वाचा… “एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO

काका-काकूंचा डान्स व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला काका-काकूंचा हा डान्स पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात एक काका आणि काकू जबरदस्त डान्स करताना दिसतायत. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम लखन’ चित्रपटातील “माय नेम इज लखन” या गाण्यावर दोघं थिरकताना दिसतायत. काका-काकूंचा इतका उत्साह पाहून अनेकांनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

काका-काकूंचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @rjprasanna20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “अशा वेळी आयुष्यात वय हा फक्त एक आकडाच ठरतो”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… “मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर”, नव्या नवरीचा उखाणा ऐकून पोट धरून हसाल, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “असंच खूश राहा.” तर दुसऱ्याने “किती सुंदर” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “एक नंबर जोडी.”

Story img Loader