Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही अनेक महिलांना वेगवेगळ्या भन्नाट गाण्यांवर भन्नाट डान्स करताना पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काकुंनी मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नकळत थिरकायला लागाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गाणे सुरू आहे. “हाई झुमक्या वाली पोर” या गाण्यावर काकू भन्नाट डान्स करत आहेत. सुरूवातीला काकु मस्त गॉगल लावून साडी नेसून तालामध्ये गोल फिरतात. मग गाणे चालू होताच काकू डान्स करायला सुरूवात करतात. गाण्यांच्या बोलासोबत अगदी त्याला जुळतील अशा पद्धतीने डान्स स्टेप्स काकू करत असतात. शेवट देखील भन्नाट आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा.

हा व्हिडिओ तुम्हाला देखील नक्की आवडेल. “हाई झुमक्या वाली पोर” या गाण्यानं काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अहिराणी भाषेतील हे गाणं सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग होतं. इन्स्टाग्राम रिल्स असोत की युट्युब, फेसबुक, व्हाट्सअँप स्टेटस यावर हेच गाणं ट्रेंड होत होतं. याच गाण्यावर काकूंनी जबरदस्त असा डान्स करुन सगळ्यांनाच थक्क केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> काय गरज होती का गं? मुलाकडे बघण्याच्या नादात स्कूटीवरुन धपकन पडली तरुणी; ‘हा’ VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रामवर lavanipremi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘काकूंचा नाद नाय’ तर आणखी एकाने म्हटले आहे की, “मला वाटते काकुंनी मनसोक्त डान्स केला आहे, आयुष्य असं जगता आलं पाहिजे”. तसेच दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, यांचा डान्स पाहून मलाही डान्स करायची इच्छा झाली. हा व्हिडीओ अनेकांनी रिपोस्ट देखील केला आहे.

Story img Loader