Dance Viral Video: सोशल मीडियामुळे सतत विविध गाणी व्हायरल होताना आपण पाहतो. रिल्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाल्यापासून जगभरातील काही गाणी क्षणात लोकप्रिय होतात. गाणं व्हायरल होताच लाखो युजर्स त्यावर रिल्सदेखील बनवतात. शिवाय रिल्सवरच नाही तर अनेक कार्यक्रमांमध्येही ही गाणी आवर्जून लावली जातात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘सुसेकी’, ‘तौबा तौबा’ अशी अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणी देखील खूप चर्चेत येतात. दरम्यान, आता एका चिमुकलीचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ती एका मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

लहान मुलांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो ज्यात ती बिनधास्त स्टेजवर डान्स करताना किंवा गाणं गाताना, अभिनय सादर करताना दिसतात. चिमुकल्यांच्या या व्हिडीओवर लाखो व्ह्यूज आणि लाइक्सही मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ज्यात एक चिमुकली सुंदर डान्स करताना दिसतेय जे पाहून नेटकरी तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटातील ‘तुमच्या फॅमिली केळेवालीला घेणार का?’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहुन नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rajdhani_satara03 या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत जवळपास चार लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर पंचवीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: ‘युक्तीचा अनोखा खेळ…’ श्वानाची शिकार करण्यासाठी वाघाने लढवली शक्कल… VIDEO पाहून युजर्सही झाले शॉक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘किती गोड आहे, माझी पण मुलगी अशीच आहे.”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘किती गोड आहे ही’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘सुपर क्यूट बेबी.’ तर इतर अनेक जण चिमुकलीचं कौतुक करताना दिसत आहेत.