Viral Video: समाजमाध्यमांवर सतत नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ, अशा अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. ज्यामध्ये अनेकजण चर्चेत असलेल्या गाण्यांवर रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत तसेच अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘सुसेकी’, ही गाणी भारतात खूप चर्चेत आली आहेत. ज्यावर लाखो लोकांनी रील्स बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता एक चिमुकली सुसेकी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियामुळे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. आताच्या मुलांमध्ये सोशल मीडियाप्रती खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे, त्यामुळे सोशल मीडियावर ते नवनवीन गाण्यांवर सादरीकरण करता ना दिसतात. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओतील चिमुकली ‘पुष्पा २’ मधील ‘सुसेकी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गोड चिमुकली ‘पुष्पा २’ या चित्रपटातील चर्चेत असलेल्या ‘सुसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या डान्स स्टेप्स जबरदस्त असून तिच्या चेहऱ्यावरचे हावभावदेखील लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर वीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: तूच खरा देवमाणूस! स्वतःचा जीव धोक्यात घालून श्वानाने वाचवला मांजरीच्या पिल्लाचा जीव; VIDEO एकदा पाहाच..

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूपच सुंदर’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘सगळ्यांसारखेच पण तरीही थोडे वेगळे’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘काय एक्सप्रेशन्स आहेत’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘कडक डान्स मुली.’