Dance Viral Video: बाप आणि लेकीचे नाते नेहमीच खूप खास असते. लेक आपल्या बाबांसाठी आणि बाबा आपल्या लेकीसाठी काहीही करायला तयार असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगी तिच्या बाबांबरोबर ‘बघ बघ अगं सखे कसं गुबू गुबू वाजतंय’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर सातत्याने विविध वयोगटांतील, विविध देशांतील, विविध भाषांचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ युजर्सना इतके आवडतात की, ज्यामुळे ते खूपच चर्चेत येतात. हल्लीच्या अनेक लहान मुलांमध्येही सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण आहे. नवनवीन गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘बघ बघ अगं सखे कसं गुबू गुबू वाजतंय’ या जुन्या मराठी गाण्यावर डान्स करत असून सुरुवातीला ती एकटीच नाचते, त्यानंतर तिचे बाबादेखील तिच्याबरोबर नाचायला सुरुवात करतात. या दोघांची ही जुगलबंदी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खतरनाक, कडक, बवाल धमाल, कमाल, सुपर से उपर” आणखी एकाने लिहिलेय, “किती भारी राव!” आणखी एकाने लिहिलेय, “चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स चांगले आहेत. खूप छान नाचलीस.”