Viral Video: अनेक लहान मुलांना त्यांच्या बालपणापासूनच आपली आवडती कला कोणती, छंद कोणते हे कळतं; त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी सुंदर डान्स करताना दिसतं तर कधी कोणी सुमधूर आवाजात गाणं गाताना दिसतं. शिवाय अनेक जण अभिनयही करताना दिसतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.

हल्ली सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यातील काही व्हिडीओ निरर्थक विषयांवर आधारित असतात, ज्याला व्ह्यूज लाखो असल्या तरीही त्यातून शिकण्यासारखे किंवा मनोरंजन होईल असे काहीच नसते. पण, अनेक युजर्स असेही असतात, जे सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली देवरा या तेलुगू चित्रपटातील ‘चुटामल्ले’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला चिमुकलीसह एक तरुणीदेखील डान्स करताना दिसत आहे. या दोघी मिळून करत असलेल्या भन्नाट डान्सचेही युजर्स कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा: अरे देवा, चिमुकल्याची मोठी करामत! फटाका तोंडात पकडून पेटवला; पुढे जे घडलं.. VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि ७० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “मन जिंकलंस मुली” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूपच सुंदर डान्स.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “तुझा डान्स पाहातचं राहावसं वाटतं” तर आणखी अनेक युजर्स चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.

Story img Loader