Dance Viral Video: लहान मुलांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो, ज्यात ती मुलं बिनधास्त स्टेजवर डान्स करताना किंवा गाणं गाताना, अभिनय सादर करताना दिसतात. चिमुकल्यांच्या या व्हिडीओंना लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात दोन लहान मुली सुंदर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून, नेटकरीही त्या मुलींचं कौतुक करताना दिसत आहेत.
हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात. एखादं नवीन गाणं आलं की, ते त्यांना नेहमीच तोंडपाठ असतं. त्याशिवाय गाण्यातील डान्स स्टेप्सवरही त्यांचं अचूक लक्ष असतं. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कार्यक्रमामध्ये दोन लहान मुली सुपली सोन्याची गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी त्या दोघींनी हातामध्ये सुपली घेतली असून, यावेळी त्यातील एक चिमुरडी एकाच जागी उभी राहून नाचत असून, दुसरी चिमुकली मोठ्या उत्साहात नाचताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @yanvi_event_23 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ४० हजारांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “छोटा पॉकेट बडा धमाका.” दुसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “किती गोड आहेत या दोघीही.”