Viral Video: सोशल मीडियावर आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील विविध व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहिले असेल. या व्हिडीओत कधी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना कविता शिकविताना दिसतात; तर कधी काही विद्यार्थी डान्स, अभिनय किंवा इतर कला सादर करताना दिसतात. आताही एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात शाळेतील वार्षिक समारंभामध्ये काही विद्यार्थ्यी डान्स करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी, वार्षिक समारंभात केलेला डान्स नेहमीच आपल्या स्मरणात असतो. सध्या एका शाळेतील विद्यार्थ्यांचा असाच एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेचे दिवस आठवतील.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शाळेतील काही विद्यार्थी शाळेतील वार्षिक समारंभामध्ये स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी ते ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ या मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांचा डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_epic_jokes या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि १३ हजारांहून लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “शेवटी जिल्हा परिषद शाळा आहे. कडक डान्स पोरांनो.” आणखी एकाने लिहिलेय, “सगळे छान नाचले, सगळी पिल्लं पास झाली.”