अंकिता देशकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

New Animal Species Found Reality Check: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने इंटरनेटवर जणू काही वर्चस्व केले आहे. कॉन्टेन्ट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे एआय टूल्सची अधिक प्रगती होत आहेत. एआय-वरून बनवलेले फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर्चस्व गाजवत आहेत पण त्याच वेळी या वास्तववादी फोटोंसह लोकांची विविध दाव्यांच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. आम्हाला सध्या असेच काही फोटो आढळून आले आहेत ज्यातील वास्तवाचा आभास पाहून लोकं थक्क झाली आहेत.

ट्विटर यूजर MARDUK Shoemaker ने व्हायरल चित्र शेअर करत लिहले की प्राण्यांची एक नवी प्रजाती सांता क्लारा, पेरू मध्ये सापडली आहे.

आम्हाला याच दाव्यासह हि प्रतिमा फेसबुक वर देखील शेअर करण्यात येत असल्याचे समजले.

एका साध्या गूगल रिव्हर्स इमेज सर्चने आम्हाला या फोटोचे निर्माते कोण हे समजलं. हे फोटो फेसबुक ग्रुप MidJourney Official वर पोस्ट करण्यात आले होते आणि तिथूनच ते व्हायरल झाले असावे.

या ग्रुपच्या इतर मेंबर्सने या फोटोवर कमेंट करून लिहिले होते, कि हे फोटो नक्कीच एआय निर्मित आहेत.

त्या नंतर आम्ही तीन एआय आर्ट डिटेक्टर्स द्वारे हे चित्र तपासले. यात ‘Optic AI or Not’, ‘Maybe’s AI Art Detector’ आणि ‘Hive AI Detector’ चा समावेश होता.

आता आम्हाला अजून एआय-निर्मित प्राण्यांचे फोटो सापडते का, यासाठी आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स शोधले. आम्हाला अजून एक फोटो सापडला ज्यात दावा केला गेला होता कि एका फ्लोरिडाच्या माणसाने मगरी सोबत लग्न केले.

आम्हाला ह्या फोटोचे मूळ देखील MidJourney Official या फेसबुक ग्रुप वर सापडले.

तसेच आम्हाला एआय-निर्मित एका बेबी स्लॉथचे फोटो ऑनलाईन सापडले, एआय टूल्स मध्ये काही दोष असतात त्यामुळेच बऱ्याच वेळा एखादे चित्र निरखून बघितल्यास, हे चित्र एआय-निर्मित असल्याचे लक्षात येते. जसे कि या चित्रात अंगठ्यावर बेबी स्लॉथ बसला आहे, त्याच अंगठ्याच्या बनावटीमध्ये त्रुटी दिसतात.

पण आम्हाला खरे चित्र एका स्टॉक इमेजेस वेबसाईट वर सापडले.

https://stock.adobe.com/in/571212905?clickref=1011lwPMeHCC&mv=affiliate&mv2=pz&as_camptype=&as_channel=affiliate&as_source=partnerize&as_campaign=pkrat

निष्कर्ष: एआय आर्ट डिटेक्टरने या सर्व प्रतिमा AI टूल्स वापरून तयार केल्या असल्याचे सांगितले. परंतु लोकांचे प्राण्यांबद्दलचे वेड आणि प्रेम, अर्थातच त्यांना एआय-ऍपचे यश यामुळे या फोटोजवर सहज विश्वास ठेवता येतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous animal dinasour turtle salinder mixture found in huge mud people are stunned by images check photos reality svs
Show comments