Fish Attack On A Girl Viral Video : बोटीने प्रवास करून माशांसोबत मस्ती करणाऱ्या तरुणीला जन्माची अद्दल घडली आहे. घरातील पाळीव प्राणी असो वा पाण्यातील मासे, अनेकांना त्यांना खायला देणं आवडतं. परंतु, काही प्राण्यांना माणसांच्या भावना समजत नाहीत आणि ते त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवतात. अशाच प्रकारचा एक खतरनाक व्हिडीओ ट्वीटवर व्हायरल झाला आहे. एका तरुणीने पाण्यात असलेल्या माशांना अन्न देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या पाण्यात मोठा मासा असल्याने त्याने तरुणीच्या हातावर हल्ला केला आणि तिला जखमी करण्याचा प्रयत्न केला. पाण्यात माशाने हाताला चावा घेतल्यानंतर तरुणीनं काय केलं, हे पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका नदीतून बोटीद्वारे प्रवास करताना तरुणी माशांना खाऊ देण्याचा प्रयत्न करते. परंतु,पाण्यातही माणसांवर हल्ला करणारे आक्रमक मासे असतात, याचा त्या तरुणीला कदाचित विसर पडला असावा. कारण तरुणीने पाण्यात हात टाकताच पाण्यात असलेल्या माशाने खाऊ खाण्याऐवजी तिच्या हातावरच हल्ला केला. पण सुदैवाने तो मासा पाण्यात परत गेल्याने तरुणीच्या हाताला मोठी दुखापत झाली नाही. माशाने हल्ला केल्यानंतर तरुणीच्या अंगावर काटा आल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
इथे पाहा माशाचा थरारक व्हिडीओ
@Enezator नावाच्या ट्वीटर यूजरने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओला आतापर्यंत २७ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर साडेसात हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओ रिट्वीटही केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत OMG असं कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. कारण हा व्हिडीओ थरारक असल्याने अनेकांच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. समुद्रात किंवा नदीच्या पाण्यातून प्रवास करताना शार्कसारखे मासे माणसांवर हल्ला करतात. त्याामुळे पाण्यात असतानाही माणसांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकू नये आणि अशा घटनांपासून सावध राहावे.