Shocking Video Of landslide Goes Viral : हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातल्यानं पूर आला आहे. हिमाचलमधील कुल्लू, मंडी, शिमला आणि चंबा परिसरात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. घाट रस्त्यावरही दरडी कोसळत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. निसर्गाने रौद्ररुप धारण केल्याने हिमाचलमध्ये दरडी कोसळण्याच्या १४ घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. डोंगरकड्यांवरून मोठमोठे दगड रस्त्यावर पडत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. सनवारा येथील काल्का-शिमला राष्ट्रीय महामार्गावरही दरड कोसळ्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोंगर माथ्यावरून मोठी दरड कोसळत असताना दोन-तीन गाड्या काही सेकंदाच्या आत रस्त्यावरून पुढे गेल्या. नाहीतर या गाड्यांवर दरडीचे दगड कोसळून मोठा अपघात झाला असता. म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ नाही, असंच काहीसं घडलं असल्याचं या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. रस्त्यावरून जाताना नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघाताला सामोरं जावं लागणार नाही.

नक्की वाचा – अंडी चोरणाऱ्या महिलेवर मोराने केला भयानक हल्ला, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचीही उडेल घाबरगुंडी

इथे पाहा व्हिडीओ

हिमाचलमध्ये पावसाने तांडव घातलेलं असतानाचा आता दरडी कोसळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे प्रवासी जीव धोक्यात टाकून वाहन चालवत असल्याचं एक व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. काल्का-शिमला राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने गाड्या जात असतानाच अचानक डोंगरावरून दरड कोसळली. पण दैव बलवत्तर म्हणून दगड कोसळण्याच्या काही सेकंदाच्या आतच या गाड्या पुढे निघून गेल्या आणि प्रवाशांचा जीव वाचला. @gagan4344 नावाच्या यूजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.