Shark Attack Video in Maldives: निळ्याशार समुद्राचं रहस्य जाणून घेण्यासाठी चार गोताखोर निघाले, समुद्राच्या तळाकडे जाताना हळूहळू इतक्या खोलात पोहोचले की सूर्याची किरणेही त्यांना दिसणं बंद झालं, अंधारमयी समुद्रात अचानक लांबून घोंघावणाऱ्या वादळासारखा आवाज येऊ लागला, काहीच सेकंदात हा आवाज वाढत गेला आणि शांत समुद्रात खळबळ जाणवू लागली, विचार करूनही धडकी भरेल असा भला मोठा शार्क गोताखोरांच्या दिशेने येताना दिसला आणि तितक्यात… हे सगळं स्वप्न होतं असं वाटून त्यांनीही डोळे उघडण्याचं प्रयत्न केला पण एरवी एखाद्या भीतीदायक स्वप्नात दिसणारी ही गोष्ट प्रत्यक्षच घडत होती. बरं का मंडळी ही काही रचलेली कहाणी नाही तर असा थरार खरोखरच एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केमन आयलंडमधील मासेमारी मार्गदर्शक, कॅमेरॉन किर्ककोनेल यांनी इंस्टाग्रामवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. सदर प्रकार त्यांच्या बाबत घडला नव्हता पण अशाप्रकारचे शार्कचे हल्ले हे एखाद्याला कसे चकित करू शकतात हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. आपल्याला आपण जिथे सुरक्षित आहोत असे वाटू शकते पण खरंतर तुम्ही तिथेच सर्वात असुरक्षित असता अशा आशयाचे कॅप्शन देत हा व्हिडीओ किर्ककोनेल यांनी शेअर केला होता. १ लाख २६ हजार फॉलोवर्ससह शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कॅप्शननुसार हा व्हिडीओ मालदीवमधील आहे. ही घटना अलीकडेच घडली होती व यात हल्ला झालेल्या गोताखोरांना शार्क माशांचा फार अनुभव नव्हता.

फेब्रुवारीच्या सुरुवातीला स्थानिक न्यूज चॅनल मायक्रिसिसने टेलिग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला होता. यामधे कोणीही जखमी झाले नाही. दोरी किंवा जाळ्यात अडकलेल्या शार्कला मोकळे करण्याचा प्रयत्न या गोताखोरांनी केला होता, हेच क्षण या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

दरम्यान या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत या गोताखोरांना फक्त शार्कच्या नाकावर स्पर्श करून त्याला दिशा दाखवायला हवी होती अशी कमेंट केली आहे. तर काहींनी मस्करीत या शार्कने आपल्या मित्रांबरोबर पैज लावून मी एकाच फेरीत किती जणांवर हल्ला करू शकतो हे दाखवायचा प्रयत्न केला आहे, अशीही कमेंट केली आहे.

हे ही वाचा<< केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय क्रिएटर पुरस्काराची घोषणा; २० इन्फ्लुएन्सर्सचा होणार सन्मान, कशी आहे प्रक्रिया?

दुसरीकडे, दरवर्षी, जगभरात सुमारे १०० शार्क हल्ले होतात, समुद्रात असताना असंख्य जलतरणपटूंना शार्कने मारले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये, ऑस्ट्रेलियातील एका समुद्रकिनाऱ्यावर शार्कच्या हल्ल्यात एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला होता. इनेस नॅशनल पार्कमधील एथेल बीचजवळ झालेल्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला होता.