Bride and groom Dangerous photo shoot: लग्नाचे अनेक मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. त्यामध्ये वधू आणि वर, मिरवणूक, पुष्पहार आणि नातेवाईकांच्या मजेदार कृत्यांचे व्हिडीओ असतात. असाच एक व्हिडीओ (viral video)सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो विनोदी वाटत नसला तरी धोकादायक नक्कीच आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि तुम्ही विचारात पडाल.हा व्हिडीओ एका लग्नाच्या फोटोशूटचा आहे. ज्यामध्ये वधू आणि वर एक धोकादायक फोटोशूट करताना दिसत आहेत. असे फोटोशूट तुम्ही याआधी पाहिले नसेल. व्हिडीओमध्ये वधू-वर कपड्यांना आग लाऊन फोटोशूट करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वास्तविक जीवनातील स्टंट कपल गॅबे जेसॉप आणि अम्बीर बेबीर, दोघेही त्यांच्या लग्नात स्टंट करताना दिसत आहेत. आपल्या लग्नाच्या दिवशीही काहीतरी हटके करण्याचा विचार केला, जे पाहून पाहुणे स्तब्ध होतील. सहसा तुम्ही पाहिलेच असेल की लोक फोटो काढतात किंवा हातात फुलं घेऊन लग्नात प्रवेश करतात. मात्र या जोडप्याने असे न करता लग्नात प्रवेश केला आणि आगीसोबत स्टंट करताना फोटोशूट करून घेतले.
(हे ही वाचा: “शोधू कुठं…शोधू कुठं…” म्हणत मुंबईच्या चाहत्यांनी चेन्नईच्या चाहत्यांना केलं ट्रोल; वानखेडे स्टेडियमवरचा मजेशीर Video Viral)
(हे ही वाचा: थरारक! हिमाचलच्या डोंगरदऱ्यातून बस चालवणाऱ्या ड्रायव्हरचा Video Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. कारण असे धोकादायक फोटोशूट याआधी कोणी पाहिलेले नाही. या व्हिडीओला टिकटॉकवर १५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हाच व्हिडीओ इंस्टाग्रामवरही पोस्ट करण्यात आला आहे. लक्षात ठेवा की तुम्ही असे स्टंट कधीच करू नये कारण ते व्यावसायिक आहेत आणि त्यांच्यासोबत तज्ञांची संपूर्ण टीम असते. त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणल्याचे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.