Bullet In Utensil: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जाणारा एक फोटो आढळून आला. या फोटोमध्ये एक मोठा टोप दिसून येत आहे ज्यावर एक ताट ठेवलेले आहे. या ताटावर बंदुकीची एक गोळी अडकलेली दिसते. हा फोटो नुकत्याच झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, तपासादरम्यान असे आढळून आले की फोटो बंडखोर गट आणि सत्ताधारी लष्करी गट यांच्यात झालेल्या संघर्षातील आहे. याशिवाय व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये एक मोठी चूक असून, एक महत्त्वाचा तपशील गाळलेला आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण पाहूया.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Pooja Kumari ने व्हायरल चित्र #FarmersProtest2024 या सह शेअर केले.

इतर वापरकर्ते देखील त्याच दाव्यासह समान प्रतिमा सामायिक करत आहेत.

तपास:

आम्ही इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला. मूळ रिव्हर्स इमेज सर्च दरम्यान आम्हाला बांग्ला भाषेतील बातमी आढळून आली.

https://www.24onbd.com/%E0%A6%8F%E0%A6%AC%E0%A6%BE%E0%A6%B0-%E0%A6%9F%E0%A7%87%E0%A6%95%E0%A6%A8%E0%A6%BE%E0%A6%AB%E0%A7%87%E0%A6%B0-%E0%A6%B6%E0%A6%BE%E0%A6%B9%E0%A6%AA%E0%A6%B0%E0%A7%80%E0%A6%B0%E0%A6%A6%E0%A7%8D%E0%A6%AC%E0%A7%80%E0%A6%AA-%E0%A6%93-%E0%A6%B8%E0%A7%87%E0%A6%A8%E0%A7%8D%E0%A6%9F%E0%A6%AE%E0%A6%BE%E0%A6%B0%E0%A7%8D%E0%A6%9F%E0%A6%BF%E0%A6%A8-%E0%A6%B8%E0%A7%80%E0%A6%AE%E0%A6%BE%E0%A6%A8%E0%A7%8D%E0%A6%A4%E0%A7%87-%E0%A6%97%E0%A7%8B%E0%A6%B2%E0%A6%BE%E0%A6%97%E0%A7%81%E0%A6%B2%E0%A6%BF%E0%A6%B0-%E0%A6%B6%E0%A6%AC%E0%A7%8D%E0%A6%A6

हा फोटो एका बांगलादेशी न्यूज पोर्टलवर होता आणि १६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता. वृत्तात नमूद करण्यात आले आहे की, बांगलादेशच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्थानिकांच्या स्वयंपाकघरातील डेक्सी (पॅन) च्या झाकणात म्यानमारच्या गोळ्या आल्या आहेत. रिपोर्ट मध्ये टेकनाफमधील शाहपरिर द्विप आणि सेंट मार्टिन दरम्यान गोळीबाराचे वृत्त दिले आहे.

इतर अनेक पोर्टल्सनेही याच फोटोसह बातम्या दिल्या आहेत.

টেকনাফের শাহপরীরদ্বীপ ও সেন্টমার্টিন সীমান্তে গোলাগুলির শব্দ
https://www.dailynayadiganta.com/chattagram/814554/%E0%A6%8F%E0%A6%AC%E0%A6%BE%E0%A6%B0-%E0%A6%9F%E0%A7%87%E0%A6%95%E0%A6%A8%E0%A6%BE%E0%A6%AB%E0%A7%87%E0%A6%B0-%E0%A6%B6%E0%A6%BE%E0%A6%B9%E0%A6%AA%E0%A6%B0%E0%A7%80%E0%A6%B0%E0%A6%A6%E0%A7%8D%E0%A6%AC%E0%A7%80%E0%A6%AA-%E0%A6%93-%E0%A6%B8%E0%A7%87%E0%A6%A8%E0%A7%8D%E0%A6%9F%E0%A6%AE%E0%A6%BE%E0%A6%B0%E0%A7%8D%E0%A6%9F%E0%A6%BF%E0%A6%A8-%E0%A6%B8%E0%A7%80%E0%A6%AE%E0%A6%BE%E0%A6%A8%E0%A7%8D%E0%A6%A4%E0%A7%87-%E0%A6%97%E0%A7%8B%E0%A6%B2%E0%A6%BE%E0%A6%97%E0%A7%81%E0%A6%B2%E0%A6%BF%E0%A6%B0-%E0%A6%B6%E0%A6%AC%E0%A7%8D%E0%A6%A6

आम्हाला ढाका मेल वेबसाइटवर देखील प्रतिमा सापडली.

https://dhakamail.com/country/148295

या बातमीचे इंग्रजीत भाषांतर केल्यावर लक्षात येते की, म्यानमारमधील संघर्षामुळे बांगलादेश सीमेवर दंगल झाल्याचे या अहवालात लिहिलेले आहे. सदर अहवाल ७ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकाशित झाला.

हे ही वाचा<< Gmail सेवा बंद होणार? कंपनीचं पत्र व्हायरल; एलॉन मस्कच्या ‘त्या’ बंदूक पोस्टने चर्चेला उधाण; खरा निर्णय काय?

निष्कर्ष: भांड्याच्या झाकणात अडकलेल्या गोळीचा व्हायरल झालेला फोटो नुकत्याच झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा नाही. जेव्हा म्यानमारमधील संघर्षांमुळे बांगलादेशात गोळीबार झाला होता त्या घटनेचा हा फोटो आहे.

Story img Loader