Shocking video: लाईफलाईन समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. लोकल ही प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने प्रवासी लोलकच्या मागे जीव मुठीत धरुन धावतो आणि लोलकमध्ये चढतो. काही मंडळी अक्षरश: पूर्ण ताकत एकवटून डब्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. काही जणं तर फुटबोर्डवर एक पाय ठेवून पूर्ण प्रवास करतात. सध्या लोकल प्रवासाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात अंत्यत धोकादायक पद्धतीने प्रवास करताना प्रवासी दिसत आहेत. लोको पायलटसमोर प्रवाशी लटकले आहेत, इतकेच नव्हे तर इंजिनापुढे उभे राहिले आहे. पश्चिम बंगालमधील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भरधाव वेगात लोकल जात आहे आणि यामध्ये लोक मोठ्या संख्येने लोकलच्या दरवाजात लटकलेले दिसत आहेत. संपूर्ण लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. त्यामुळे लोक मिळेल त्या जागेवर आपला जीव धोक्यात घालून उभे आहेत. एवढंच नाहीतर लोकं अक्षरश: लोको पायलटच्या केबिनमध्ये, केबिनच्या बाहेरही लटकत आहे. सर्वात भयंकर म्हणजे काही जण तर लोकलच्या समोरच उभे आहेत. त्यामुळे कदाचीत लोको पायलटलाही अडचणी येत असल्याची शक्यता आहे.

स्वत: बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालण्याचा हा सगळा प्रकार सुरु असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत युजरने भारतीय रेल्वे मंत्रालयाने त्वरीत दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. काहींनी हा व्हिडिओ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केला आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लंडनच्या रस्त्यांवर भारतीय संस्कृतीचं दर्शन; ‘या’ तरुणीचा VIDEO एकदा पाहाच

लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल मृत्यूचा सापळा बनत आहे. त्यामुळे तुम्हीह लोकलने प्रवास करताना स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. या व्हिडीओवर आता युजर्स प्रतिक्रिया देऊन आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले, ‘जिवंत राहिला, हीच खूप मोठी गोष्ट आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘यमराज यावेळी अयोध्येत असावेत, त्यामुळेच त्याचा जीव वाचला.’