देशभरात पावसाळ्याला चांगलीच सुरुवात झाली आहे. गेला आठवडाभर भरपूर पाऊस पडला असून यामुळे अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. अशावेळी आपल्या घरातील सामानाची नासधूस तर होतेच पण याशिवाय घरामध्ये नको असलेले पाहुणे येण्याची शक्यताही वाढू लागते. हे पाहुणे म्हणजे वेगवेगळे कीटक आणि प्राणी. पावसाच्या दिवसांमध्ये वेगवेगळे कीटक आणि प्राणी आपल्या बिळांमधून बाहेर पडतात आणि इतरत्र आसरा शोधतात. यामध्ये बेडूक, पाल घूस, उंदीर, विंचू, साप यांसारख्या प्राण्यांचा समावेश होतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. हे प्राणी शूज, टॉयलेट, कार, बाईक इत्यादींमध्ये कुठेही लपून राहू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावसाच्या दिवसांमध्ये आपल्याला अशा जनावरांपासून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ते कुठे लपतील याचा काही नेम नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्ट नीट तपासून वापरणे गरजेचे आहे. जे लोक जंगलाच्या परिसरात राहतात, ते जेव्हा आपले बूट घालतात तेव्हा ते नेहमी झाडून घेतात. बुटांच्या आतमध्ये साप किंवा विंचू किंवा इतर कोणतेही विषारी प्राणी तर लपलेले तर नाही ना, याची ते खात्री करून घेतात. अनेकदा लोक आपल्या वस्तू न तपासता घालतात. यामुळे त्यांना जीवही गमवावा लागू शकतो.

ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी लढवली शक्कल; लोकलमधील इतर प्रवाशांना पण केलं सामील; पाहा नक्की काय झालं

सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका बुटाच्या आत एक धोकादायक साप लपला आहे. बाहेरून पाहणाऱ्याला बुटामध्ये काहीतरी आहे हे अजिबात कळणार नाही. मात्र जेव्हा या बुटात काठी टाकली तेव्हा त्या सापाने फणा काढला आणि समोर असलेल्या व्यक्तीवर हल्ला केला.

अबब! या माणसाने फक्त दातांच्या मदतीने खेचल्या तब्बल पाच गाड्या; पाहा Viral Video

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “पावसाळ्यात तुम्हाला हे जीव सर्वात विचित्र ठिकाणी सापडतील. काळजी घ्या. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत घ्या.” या कॅप्शनद्वारे ते लोकांना हा संदेश देत आहे की, कोणतीही गोष्ट वापरण्यापूर्वी ती नीट तपासून पाहा. व्हिडीओमध्ये दिसत आहे की बुटाच्या आत एक साप फणा पसरवून बसला आहे.