अंकिता देशकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

24 Year Old Women Brutally Beaten And Killed: मणिपूरमध्ये एका महिन्याहून अधिक काळ हिंसाचार सुरू असताना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. मणिपूरमधील ‘कुकी’ जमातीच्या मुलीवर अमानुष हल्ला करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे. व्हिडिओमध्ये वाहने हल्ल्याच्या ठिकाणाहून जाताना दिसत आहेत तर लोक महिलेवर हल्ला करत आहेत.लाईटहाऊस जर्नालिज्मच्या तपासात या भीषण व्हिडिओची पडताळणी करण्यात आली आहे. ज्यातून समोर आलेले सत्य सुद्धा तितकेच चिंताजनक आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर ने व्हायरल व्हिडिओ शेअर करत इंग्रजी मध्ये लिहले: “मणिपूरमधील कुक्की ख्रिश्चन मुलीवर क्रूर हल्ला आणि हत्येचा धक्कादायक व्हिडिओ. हे खूप भीषण आहे, मणिपूर आणि भारत ‘द्वेषाच्या राजवटीत’ काय बनत चालले आहे याचे दुःखद वास्तव आहे. मणिपूरसाठी प्रार्थना करा, भारतासाठी प्रार्थना करा.”

(व्हिडिओचे स्वरूप लक्षात घेऊन, आम्ही पोस्टची थेट लिंक शेअर करत नाही).

इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आमची तपासणी सुरू केली. त्यातून आम्हाला अनेक स्क्रीन ग्रॅब्स मिळाले. त्यानंतर आम्ही विविध कीफ्रेम्सवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. आम्हाला news-eleven.com वर एक आर्टिकल सापडले.

त्याच व्हिडिओचा स्क्रीनशॉट येथे वापरला होता. वृत्तपत्राने नमूद केले आहे की ज्या तरुणीला गोळी मारण्यात आली ती २४ वर्षीय नॉन-सीडीएम शिक्षिका, डाव आये मा तुन होती, जी तमू येथे राहत होती. बर्मी भाषेतील लेख ३ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाला.

https://news-eleven.com/article/241278

आम्हाला व्हायरल व्हिडिओ gorecenter.com वर डिसेंबर २०२२ मध्ये शेअर केल्याचे देखील आढळले.

https://www.gorecenter.com/beating-and-execution-of-woman/

आम्हाला rfa.org वर आणखी एक बातमी सापडली. बातमीत नमूद केले होते की, ‘NUG च्या अध्यक्षीय कार्यालयाचे प्रवक्ते Sagaing डिव्हिजन U Kyaw Zaw, RFA ला सांगितले की राष्ट्रीय एकता सरकार तमू शहरातील एका महिलेला स्थानिक संरक्षण दलाने रस्त्यावर न्यायबाह्यपणे मारहाण केली होती. हे प्रकरण स्वीकारणार नाही’.

https://www.rfa.org/burmese/news/tamu-murder-12042022020211.html

आम्हाला mgronline.com वर ४ डिसेंबर २०२२ रोजी अपलोड केलेला आणखी एक लेख देखील सापडला. बातमीत बर्मीज भाषेत म्हंटले होते: बंडखोर सशस्त्र गटांच्या गटाने रस्त्यावर एका महिला शिक्षिकेवर अत्याचार केला. जबरदस्तीने गोळीबार करण्यापूर्वी बर्मी सैन्यासाठी गुप्तहेर असल्याची कबुली दिली.

https://mgronline.com/indochina/detail/9650000115492

हे ही वाचा<< भररस्त्यात ट्रॅफिक सिग्नल वितळला! कारण वाचून व्हाल हैराण, घटना खरीच पण हे सत्य कोणी सांगत नाही

निष्कर्ष: एका महिलेवर हल्ला करून रस्त्याच्या मधोमध गोळ्या घातल्याचा व्हायरल झालेला त्रासदायक व्हिडिओ भारतातील मणिपूरचा नसून तो म्यानमारमधील जुना आहे. बंडखोर सशस्त्र गटाच्या एका गटाने रस्त्यावर एका महिला शिक्षिकेवर अत्याचार केला आणि तिला जबरदस्तीने बर्मी सैन्यासाठी गुप्तहेर असल्याची कबुली देण्यास सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous video claiming manipuri kukki tribe girl beaten to death abused in front of by passers on road reality is brutal svs