२०२० पासून संपूर्ण जगावर करोनाचं सावट आहे. या दोन वर्षातील काळ आपण सगळ्यांनीच अनुभवला. यादरम्यान टाळेबंदी, नव्या करोना व्हेरिएंट्सच्या लाटा, लसीकरण हे सर्वच आपण जवळून पाहिले. अद्यापही करोनाचा धोका पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. यादरम्यान, कॅनडामधून एक नवी बातमी समोर आली आहे. या देशाच्या हरणांमध्ये झाॅम्बी बनवणारे व्हायरस सापडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हाईस वर्ल्ड न्यूजच्या बातमीनुसार, कॅनडातील हरणांच्या प्रजातींमध्ये हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्याच्या तावडीत येणारी हरणे इतर हरणांना मारून खात आहेत. कॅनडाच्या काही भागांमध्ये क्रॉनिक वेस्टिंग रोग हा महामारी म्हणून घोषित करण्यात आला आहे. अल्बर्टा विद्यापीठातील वन्यजीव रोग विशेषज्ञ मार्गो पिबस यांनी सांगितले की, ही महामारी हरणांमध्ये वेगाने पसरत आहे.

Viral Video: महिला जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थींनीसोबत केलेला ‘नगाडा बजा’वरील डान्स पाहून सारेच थक्क

कॅनडामध्ये ही महामारी १९९६ मध्ये पहिल्यांदा दिसून आली. यावेळी हा विषाणू एका शेतात पसरला आणि त्यानंतर हा विषाणू वेगाने इतर प्राण्यांमध्ये पसरला. नंतर, जेव्हा सर्व प्राणी मारले गेले, तेव्हा हा संसर्ग थांबला. बॅक्टेरिया आणि इतर विषाणूंची अनुवांशिक माहिती मिळू शकते, परंतु हरणांमध्ये पसरलेल्या या विषाणूबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

‘मधुचे पाचवे मूल…’; आधारकार्डवरील ‘त्या’ मुलीचं नाव पाहून शिक्षकांना बसला धक्का, शाळेत प्रवेश नाकारला

माणसांमध्येही पसरू शकतो हा विषाणू

क्रॉनिक वेस्टिंग रोगाबद्दल सर्वात मोठी चिंता ही आहे की ती हरणांपासून इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये किंवा अगदी मानवांमध्ये पसरू शकते. या विषाणूची लागण झाल्यानंतर, संबंधित व्यक्तीला लूज मोशन, नैराश्य आणि अगदी अर्धांगवायूचा त्रास होतो. या विषाणूचा संसर्ग संक्रमित प्राण्याचे मांस खाल्ल्याने होत नाही, तर त्याच्या लघवी किंवा लाळेच्या म्हणजेच थुंकीच्या संपर्कात आल्याने होतो. तथापि, आतापर्यंत मानवांमध्ये या संसर्गाचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous virus found in deer in canada rumor spreads among people pvp