Aamras dosa: माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. आपल्यापैकी बरेच जगण्यासाठी आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठी जेवण करता.मात्र जगात काही असेही लोक आहेत जे खूप विचित्र विचित्र पदार्थ बनवतात आणि खातातही. लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर हे विचित्र पदार्थांचे व्हिडिओ शेअर करत असतात. या विचित्र पदार्थांना लोक फ्यूजन फूड असेही म्हणतात.यामध्ये काही प्रयोग यशस्वी होतात पण काही एवढे विचित्र होतात की, अगदी नको वाटतं. नवीन ट्राय करण्याच्या नादात काही लोक त्या पदार्थांचं पूर्ण रूप पालटून टाकतात. अशातच एक विचित्र फूड कॉम्बिनेशन्सबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांची चव चाखण्याचा विचार तुम्ही कदाचित स्वप्नातही करू शकणार नाही.
आमरस चीज डोसा, खाणार का ? –
या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती आमरस डोसा बनवताना दिसत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती तव्यावर डोसा करताना दिसतो. त्यानंतर आपण एरवी त्यावर चीज, बटर, बटाट्याची भाजी किंवा साऊथ इंडियन चटणी असं काही ना काही लावतो. पण याठिकाणी डोश्यावर बटर लावल्यानंतर चक्क आमरस घालण्यात आला. इतकंच नाही तर आमरसानंतर त्यावर चीज किसण्यात आलं. आणि त्यावर चिरलेली बारीक कोथिंबीरही घालण्यात आली. त्यानंतर या डोश्याचे ४ भाग करुन त्याचे गोल रोल करुन ते ताटात देण्यात आले आणि त्यासोबत वाटीत पुन्हा आमरस देण्यात आला.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Viral Video: चिखलात लपून बसलेल्या मगरीचा भयानक हल्ला; पण ‘त्या’ एका चुकीमुळे फसला खेळ
या व्हिडिओवर अनेक नेटिजन कमेंट करत आहेत काही जणांनी तर या नवीन फ्यूजन फूड डिश वर संताप देखील व्यक्त केला आहे.