एंजेलिना निकोलाऊ हे नाव सोशल मीडियावर चांगलंच प्रसिद्ध आहे. २३ वर्षांची ही मॉडेल तिच्या साहसी प्रकारातील छायाचित्रांसाठी प्रसिध्द आहे. थरार अनुभवण्याची आवड असलेल्या एंजेलिना जगभरातील गगनचुंबी इमारतीच्या टोकावर आणि अनेक उंच ठिकाणी चढून स्वत:चे फोटो काढते. हे करताना ती अक्षरश: जीवाची बाजी लावते. आतापर्यंत तिने चीन, हाँगकाँग आणि दुबई अशा अनेक शहरांमधील उंच ठिकाणांवर जीव धोक्यात घालून फोटो काढले आहेत. इंटरनेटवर या फोटोंना अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाल्यामुळे एंजेलिना सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे.

Diwali 2017 : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली भारतभूमी, अंतराळवीराची भारतीयांना खास भेट

नुकतेच एंजेलिनाने आपला प्रियकर इव्हानसोबतचे काही फोटो शेअर केले. जे सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. या दोघांनीही हाँगकाँगमधल्या सर्वात उंच क्रेनवर चढून सेल्फी घेतले आणि फोटोशूटही केलं. हे दोघंही कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय एवढ्या उंचावर चढले होते. गेल्यावर्षी एंजेलिना जगातील सर्वात उंच इमातीवर चढून योगची प्रात्यक्षिक केली होती. या फोटोंमुळे ती अल्पावधीतच प्रसिद्ध झाली.

ऐकावे ते नवलच! ‘या’ शहरात राहण्यासाठी मिळतात पैसे

Story img Loader