पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी दोघांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) पासून डिजिटल पेमेंटपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीदरम्यान गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना पोषणाशी संबंधित काही पुस्तके भेट म्हणून दिली. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी देखील बिल गेट्स यांना ‘वोकल फॉर लोकल’ गिफ्ट हॅम्पर दिला. ज्यात विविध राज्यांतील खास उत्पादनांचा समावेश होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदींनी बिल गेट्स यांना तामिळनाडूच्या थुथुकुडी येथील मच्छिमारांनी बनवलेले खास मोती भेट दिले. यावर मोदींनी मोतीची खासियत सांगितली. ते म्हणाले की, तुतीकोरीन किंवा थुथुकुडी हे तामिळनाडूचे पर्ल सिटी म्हणून ओळखले जाते. येथील मच्छीमार या भागात खूप मोठे काम करतात.

यानंतर मोदींनी बिल गेट्स यांना तामिळनाडूतील प्रसिद्ध टेराकोटा कलेपासून साकारलेली मूर्ती भेट दिली. टेराकोटा मूर्ती देताना पंतप्रधान म्हणाले की, ही भारताची खूप जुनी परंपरा आहे, पण ही खास तमिळनाडूची कला आहे. तेथील मंदिरात आणि घरांमध्ये टेराकोटा मूर्ती ठेवलेल्या दिसतात. ते लोक पूजेसाठीही अशाच खास गोष्टी बनवतात.

इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांना काश्मीरची पश्मीना शाल देखील भेट म्हणून दिली आणि म्हणाले, आमच्या देशात ही शाल खूप प्रसिद्ध आहे. ती खास काश्मीरमधून आणली आहे.

याशिवाय पंतप्रधान मोदींनी त्यांना दार्जिलिंगचा केशर आणि निलगिरी चहाही भेट दिला. यावेळी मोदींनी बिल गेट्स यांना सांगितले की, सध्या आमच्या देशात व्होकल फॉर लोकल आणि वन डिस्ट्रिक्ट-वन प्रॉडक्ट मोहिम राबवली जात आहेत. म्हणून जेव्हा कोणी पाहुणे आमच्या देशात येतात तेव्हा आम्ही त्यांना भारतातील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यातील प्रसिद्ध वस्तू भेट देतो. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेलाही अभिमान वाटतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Darjeeling tea terracotta murti pm modi gifts bill gates vocal for local gift hampers see the pictures sjr