गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अंनत आणि राधिका अंबानीच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होती. ५ मार्च रोजी इंस्टाग्राम आणि फेसबुकला जागतिकस्तरावर बंद पडले होते त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. इंस्टाग्राम आणि फेसबुक पुन्हा सुरु झाल्यानंतर सध्या सोशल मीडियावर पार्लेजी बिस्कीटची चर्चा होत आहे.
पार्ले ग्लुकोज, पार्ले-जी बिस्किटे म्हणून लोकप्रिय, अनेक दशकांपासून जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात मुख्य पदार्थ आहे आणि १९९० च्या दशकातील प्रत्येक मुलाचे ते आवडते बिस्किट होते. बिस्किट ब्रँड अनेकांच्या बालपणीच्या आठवणींशी निगडीत आहे, कारण भारतीय घरांमध्ये चहाच्या वेळी पार्लेजी बिस्किट खाणे हा एक सामान्य गोष्ट आहे पण सोशल मीडियावर बिस्किटाच्या डार्क चॉकलेटी फ्लेवरचा फोटो व्हायरल होत आहे ज्याला डार्क पार्ले-जी असे नाव देण्यात आले आहे.
व्हायरल चित्रात पांढरे-लाल-काळ्या-रंगाचे पॅकेट दिसत आहे. पॅकेटवर मजकूर लिहिला आहे “स्वादिष्ट चॉकलेट. डार्क पार्ले-जी बिस्किट.” ‘डार्क पार्ले-जी’ मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गोंधळून जाऊ नका कारण हे मूळ बिस्कीटाचे पॅकेट नाही तर ‘डार्क पार्ले-जी’ बिस्किटांचे व्हायरल चित्र आहे. ‘डार्क पार्ले-जी’ चे हे पॅकेट, एआय निर्मीत केलेले असू शकते कारण पार्लेने उत्पादनाच्या सत्यतेची पुष्टी केलेली नाही. पण, पार्ले प्रोडक्ट्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘डार्क पार्ले-जी’ संदर्भात कोणतीही माहिती नाही आणि कंपनीने बिस्किट पॅकेटच्या व्हायरल चित्रावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान सोशल मीडियावर, ‘डार्क पार्ले-जी’ मीम्सचा पाऊस पडला आहे. अनेक वापरकर्त्यांनी बिस्किटांच्या ‘नवीन’ पॅकेटवरील पार्ले-जी मुलीच्या चित्रवरून चर्चा सुरू केली आहे.बहुतेक मीम्स असेही सुचवतात की, ‘डार्क पार्ले-जी’ गुगल जेमिनी हे एआय टुल वापरून तयार केले आहे.
हे चित्र इंटरनेटवर पोस्ट केल्यानंतर लगेचच व्हायरल झाले. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यावर भरपू प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वापरकर्त्यांचा एक गट हे चित्र AI निर्मित आहे असे मानतो तर काहीजण ‘डार्क’ पार्ले-जीच्या कल्पनेवर नाराजी व्यक्त करत आहे. . एका वापरकर्त्याने कमेंट केली केली, “हे १९८० पासूनचे ओरिओ (ओरिओ) आहे.” दुसऱ्याने कमेंट केली, “चांगले दिसत नाही.”
हेही वाचा कधीच अंघोळच करत नाही २२ वर्षाची ही तरुणी, कारण ऐकून बसेल धक्का! पाण्याला स्पर्श करताच…
“हे एडिटेड आहे की खरंच आहे?” तिसऱ्याला फोटो पाहून आश्चर्य वाटले. “हे खरे आहे की नाही हे मला माहीत नाही पण @ParleFamily. कृपया हे तयार करण्याचा विचार करा हे दिसायला खूप स्वादिष्ट आहे,” दुसऱ्याने विनंती केली.
कदाचित ते हेल्दी आहे? मैदा आणि साखर कमी?
डार्क पार्ले जी EXISTS पाहिल्यानंतर मी
डार्क पार्ले-जी, आता हे काय आहे
दरम्यान, ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर डार्क पार्ले-जीचा काहीही उल्लेख नाही.
हेही वाचा – Dry Ice खाल्याने ५ जणांना झाली रक्ताची उलटी; ड्राय आईस काय असतो? बर्फापेक्षा वेगळं काय असतं?
भारतातील पार्ले उत्पादनांद्वारे उत्पादित, पार्ले-जी हा जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बिस्किटांपैकी एक आहे. १९८० पर्यंत पार्ले-जीला ‘पार्ले ग्लुको’ बिस्किटे म्हणून ओळखले जात होते. पार्ले-जी मधील ‘जी’ मूळतः ‘ग्लुकोज’ असे होते. त्यांचे ब्रँड घोषवाक्य नंतर ‘जी फॉर जिनियस’ असे बदलले.