Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. सोशल मीडियावरील रिल्स, डान्स, गाणी अशा विविध गोष्टींनी आपले मनोरंजन होते. मात्र, अनेकदा यावर काही धक्कादायक व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा अपघात, मारहाण अशा दुर्घटनांचाही समावेश असतो. या घटना कधी माणसांसोबत; तर कधी प्राण्यांसोबतही होतात. अशा व्हिडीओंवर लोक खूप संतापल्याच्या भावनाही व्यक्त करताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते; ज्यामध्ये कुत्र्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. हे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते. अशातच आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे; ज्यात एका कुत्र्यासोबत दोन तरुण असे काही तरी करतात की, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.

हा व्हायरल व्हिडीओ गुजरातमधील वडोदरा येथील सायली गावातला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण एका भटक्या कुत्र्याला घेऊन येतात त्यावेळी एक जण त्याचे मागचे दोन पाय आणि दुसरा त्याचे पुढचे दोन पाय पकडतो आणि त्याला मोठ्या उंचीवरून खाली फेकून देतात. माहितीनुसार, त्या तरुणांनी कुत्र्याला ५० फूट उंचावरून खाली फेकले होते. अनेकांच्या मते व्हिडीओ काढण्यासाठी त्यांना कुत्र्याचा असा वाईट वापर केला असेल. पण, एखाद्या मुक्या प्राण्याचा जीव घेणारे असे क्रूर कृत्य करणे ही खूप वाईट गोष्ट आहे.

माहितीनुसार, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका प्राणीप्रेमीने मदतीसाठी संपर्क साधला. यावेळी स्थानिक पोलिसांनी या अमानवी कृत्याविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.

हेही वाचा: “आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय”; उन्हामुळे वाघाचाही चढला पारा, थंडावा घेण्यासाठी लढवली शक्कल, हा Viral Video एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून, त्यावर अनेक प्राणीप्रेमी तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय की, या व्हिडीओची दखल घेऊन या दोन तरुणांना लवकरात लवकर अटक करावी. आणखी एकाने लिहिलेय की, त्यांना त्यांच्या कर्माचं फळ देव लवकरच देईल. आणखी एका व्यक्तीने लिहिलेय की, यांनाही त्या कुत्र्याप्रमाणे उंचावरून खाली फेकायला हवं. या प्रकारे युजर्स मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करीत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ X(ट्विटर)वरील @Dilthi Gujarati या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर ४० हजारांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत.