गडकिल्ले ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रात किल्ल्यांची संख्या विपूल आहेत. सोशल मीडियावर गडकिल्ल्यांचे अनेक व्हिडीओ फोटो व्हायरल होत असतात. अनेक गडकिल्ले प्रेमी या किल्ल्यांना भेट देऊन तेथील नवनवीन गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तलवारीच्या आकाराची विहीर दाखवली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तलवारीच्या आकाराची विहीर दाखवली आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून थक्क व्हाल. विहिरीचं बांधकाम पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. ही विहीर सातारा जिल्ह्यात आहे. याला किल्ले दातेगड म्हणून ओळखले जाते.

mahesh_koli_mavala_sahyadricha या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये किल्ल्याविषयी माहिती सांगितली आहे.कॅप्शनमध्ये लिहिलेय, “किल्ले दातेगड –
पंधराव्या शतकात दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करुन हा किल्ला बहामनी राज्यात सामील केला. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. १५७२ म्ध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती. अफ़जलखानाच्या वधानंतर छ. शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. त्यांनी गडाची जबाबदारी साळुंखे नावाच्या सरदारावर टाकली होती. पाटन परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. इसवीसन १६८९ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी संताजे आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छ. राजाराम महाराजांनी त्यांना पातण महालातील ३४ गावे इनाम दिली होती. इसवीसन १७४५ मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही.”

हेही वाचा : VIDEO : भर सामन्यात विराट कोहलीने केली धोनीची नक्कल, पाहा मजेशीर व्हिडीओ

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अंगावर काटा आला बघून” तर एका युजरने लिहिलेय, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला किल्ले दाते गड”

Story img Loader