प्रत्येक जण आयुष्याचा जोडीदार निवडताना त्यात वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो. कोणाला हा जोडीदार दिसायला सुंदर हवा असतो, तर कोणाला चांगला स्वभाव असणारा, तर कोणाला समजुतदार. मुलही आपला जोडीदार निवडताना मुलीमध्ये याच गोष्टी पाहत असतात. लग्न करून आपल्या घरात येणारी सहचारिणी ही आपल्या आईसारखीच असावी. प्रेमळ, वात्सल्याचे मुर्तीमंत उदाहरण, घराला प्रेमाच्या धाग्यात जोडून ठेवणारी, सगळ्यांची काळजी करणारी. म्हणूनच तुमची बायको जर महाराष्ट्रीयन असेल तर तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. कारण मराठी मुलींमध्ये असे काही गुण असतात जे तुमचे घर एकत्र बांधून ठेवायला नक्कीच मदत करतील. अनेक हिंदी वेबसाईट्सवर या स्वरुपाची पोस्ट व्हायरल झाली आहे.
वाचा : मुलींना मेसेज करताना ‘हे’ नियम जरूर पाळा
या कारणांसाठी मराठी मुलीशी लग्न करणे उत्तम
– एकत्र कुटुंबात वाढल्याने त्यांना नात्यांची चांगली जाण असते. नाती कशी टिकवायची, घरातल्या लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांना प्रेमाच्या एका नात्यात कसे बांधून ठेवावे हे त्यांना ठाऊक असते.
– कुटुंबातील एकोपा त्या चांगल्या प्रकारे टिकवू शकतात.
– त्यांच्या मोठ मोठ्या अपेक्षा नसतात. कोणत्याही परिस्थितीत तक्रार न करता तडजोड करून त्या राहू शकतात.
– शिक्षणाचे महत्त्व त्यांना माहिती असते.
– काटकसरीचा गुण त्यांच्यामध्ये असतो.
– जरी मॉर्डन विचारांच्या असल्या तरी पारंपारिक विचार जपणा-या असतात.
– सण, उत्सव सगळ्यांसोबत आनंदात कसे साजरे करायचे त्यांना माहित असते.
– त्यांच्यातील उत्साहाने घरातले वातावरणही त्या उत्साही ठेवतात.
– प्रत्येकांच्या आवडी निवडी जाणून घेण्यात आणि त्याप्रमाणे सगळ्यांसाठी काहीना काही करण्यात त्यांना आवड असते.
– छोट्या मोठ्या गोष्टीत त्यांचा आनंद दडलेला असतो. स्वत:च्या सुखाचा विचार न करता कुटुंबियांचा आनंदाचा त्या पहिला विचार करतात.