Viral video: मुलगी आणि वडील यांचे नाते हे अतिशय खास नाते असते. या नात्यात एकप्रकारचा गोडवा असतो. वडिलांसाठी मुलगी ही राजकन्येपेक्षा कमी नसते. प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना बालपणात एक सुपरहिरो म्हणून पाहते. मुलीला वाटत असते की आपला बाप काहीही करू शकतो. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर ते फक्त तिचे वडिल असतात. एखाद्या वडिलांसाठी त्यांची मुलगी खास असते तेवढंच एका मुलीसाठी तिचे वडिलही खूप स्पेशल असतात. दोघांच्या या नात्याचे अनेक उदाहरणं, फोटो, व्हिडीओ आपण पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांना भावुक करत आहे.
लेक ही बापाचा भार नाहीतर आई-वडिलांचा आधार असते हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्व या मुलीचं कौतुक करत आहेत. म्हणतात ना बाप-लेकीच्या प्रेमात त्यांचे पैसे, ते कोणत्या घरात जन्माला आले हे मॅटर करत नाही. त्यांच्या आयुष्यातले अगदी छोटे छोटे क्षणही त्यांच्या घट्ट नात्यासाठी पुरेसे असतात. याचंच दर्शन या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरुन होतं. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, एक दिव्यांग व्यक्ती आपल्या मुलीसोबत एका हॉटेलमध्ये बसले आहेत. यावेळी वडिलांनी ही मुलगी स्वत:च्या हाताने भरवताना दिसत आहे.
मुलगी ही दुसरी आईच असते असं का म्हंटलं जातं हे या व्हिडीओवरुन कळतं. ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नात वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्यातं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> दिल्लीत भीषण पाणी टंचाई; टँकर येताच जीव धोक्यात घालून लोकांची धावपळ; VIDEO विचार करायला भाग पाडेल
या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हेच छोटे छोटे क्षण नातं घट्ट करण्यासाठी मदत करतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मोठा आनंद शोधल्यावर नातं टिकून राहतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर tuzyatali_mi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. तर नेटकरीही व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
नेटकरी मुलीचं या कृतीचे कौतुक करीत आहेत. “ही मुलगी खूप भाग्यवान आहे. कारण- तिला तुमच्यासारखे वडील मिळाले”, अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. तर दुसऱ्या एक युजरनं “अशी मुलगी सर्वांना हवी”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.