Shocking video: आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं काही असेल तर ते आपलं कुटुंब असतं, असं असलं तरीही कुटुंब म्हंटलं की सगळ्यांचे स्वभाव वेगळे त्यामुळे भांड्याला भांडं लागतंच. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सून सासरच्या मंडळींवर एवढी चिडते की ती चक्क घरालाच आग लावते. एवढंच नाहीतर बेडरुममध्ये झोपलेल्या सासऱ्यांच्या अंगावरही ती जळते कागद फेकते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला असून सर्वजण सुनेवर नाराजी व्यक्त करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
असे सांगितले जात आहे की, सुनेला आपल्या मुलाला खायला घालायचे होते, परंतु सासरच्या लोकांना त्याला झोपवायचे होते. याचा राग आल्यानं महिलेने सासरच्या मंडळींना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर महिलेने सासरच्यांची चादरही पेटवली. हा सर्व प्रकार पाहून महिलेच्या पतीने तिला खडसावलेही. तसेच त्याने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला आहे. तिचा पतीही तिच्या विरोधात बोलताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
@ShoneeKapoor नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (X) वर शेअर केला आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तुम्ही पण पहा हा अतिशय भयानक व्हिडिओ.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! विमानात कपभर चहाची किंमत पाहा; नेटकरी म्हणाले “एवढ्यात तर अख्ख्या गावाला…”
लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘देव कोणाला असे दिवस दाखवू नये.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘महिलेची हिम्मत बघा.’