प्रत्येक घरात सासू-सुनेचे किस्से ऐकायला मिळतातच काही प्रेमाचे असतात तर काही भांडणाचे. सासू-सून ही फक्त घरापुरती मर्यादित राहिली नाही म्हणजे ती पडद्यावरही आली. टीव्ही सीरिअल, फिल्म यामध्ये सासू-सुनेचं नातं दाखवलं जातं. जे पाहायला अनेकांना आवडतं. आतापर्यंत तुम्ही सासू-सुनेचे असे ड्रामे, भांडणं पाहिले असतील. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सुनेने चक्क सासूला बेदम मारलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हिडीओ गुजरातच्या सुरत शहरातून समोर आला आहे, या व्हिडीओत सासू-सूना एकमेकांना मारताना दिसल्या. संपत्तीसाठी सुनेनं सासूला मारहाण केली आहे. तिने कसलाही विचार न करता आपल्या सासूवर हात उचलला, तिला मारहाण केली.एवढंच काय तर या भांडणात सूनेनं हद्दच पार केली. तिने थेट आपल्या सासूचा गालच चावला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: भर लग्नात स्टेजवर दिरानं वहिणीला दिलं विचित्र गिफ्ट, नवरदेवानं पाहिलं अन्…

डॉक्युमेंट्री फिल्ममेकर दीपिका नारायण भारद्वाज यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण संपत्तीच्या वादातून उद्भवले आहे. ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader